विशेष माहिती :- विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज शासनामार्फत संबंधीत सावकारास अदा करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास दि. १०/०४/२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार सावकाराने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज या योजनेस अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानुषंगाने दि. १०/०४/२०१५ रोजीच्या शासन निर्णया मधील सदर अट […]
भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना सामान्य प्रशासन विभागाने दि. ४/५/२०२२ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या आहेत. आता सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय दिनांक २१ / ११ / २०२२ अन्वये भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र […]
पर्यटन विभाग व इंडियन ऑइलतर्फे प्रकाश व ध्वनी कार्यक्रम संपन्न मुंबई, दि. ८ : सामाजिक कार्य, राजकारण, प्रशासन, खेळासह प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांबरोबरीने कार्य करीत आहेत. त्यामुळे स्त्री शक्ती पुरुषांपेक्षा किंचितही मागे नाही. सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. या महिलांचा आम्हाला अभिमान असून महिलांच्या सबळीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. […]