क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून युवक स्वतःची प्रगती आणि आपल्या क्षेत्राचं नाव मोठं करू शकतो-माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम
सिरोंच्या तालुक्यातील पापय्यापल्ली येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उदघाटन संपन्न..!!
*सिरोंच्या:-* तालुक्यातील नरसिंहपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पापय्यापल्ली येथे “टायगर क्रिकेट क्लब” यांच्या सौजन्याने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते.
या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटक म्हणून माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे होते,त्यावेळी युवकांना संबोधित करताना ते म्हणाले ग्रामीण भागात क्रीडा स्पर्धा घेतल्याने युवकांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी संधी मिळते आणि क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रातील युवक स्वतःची प्रगती करू शकतो आणि आपल्या क्षेत्राचं नाव मोठं करू शकतो.असे मत यावेळी माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केलं.
क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकांना माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून 30000/-(तीस हजार रुपये) व द्वितीय क्रमांक विजेत्या स्पर्धकांना युवा नेते अवधेशबाबा आत्राम यांच्या कडून 20000/-(वीस हजार रुपये) बक्षीस देण्यात येणार आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून युवा नेते अवधेशबाबा आत्राम तर प्रमुख अतिथी म्हणून संतोष पडलवार,अनंतराव बिरदू,गगन पोलपल्ली,तिरुपती बेंजींनीवार,सतीश डोलकल्ला,संतोष कोंडापार्टी,रोहित गोगुला,शंकर जकावार,तिरुपती बोडू,स्वामी बेंजींनीवार,तसेच पापय्यापल्ली येथील गावकरी आणि युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..!