ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

या सरकारी योजनेद्वारे, तुम्हाला दरमहा मिळतील ५ हजार रुपये असा करा अर्ज

केंद्र सरकारची अल्पावधीतच सर्वाधिक लोकप्रिय झालेली योजना म्हणजेच प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना ही होय. आयुष्याची संध्याकाळ सुखात जावी यासाठी ही योजना लाभधारकांना मदत करते. तुम्ही भविष्यासाठी अधिक चांगल्या योजनेच्या शोधात असाल तर अटल पेन्शन योजना हा सर्वात शानदार पर्याय ठरू शकतो. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर वयाच्या 60 व्या वर्षानंतर दरमहा 5 हजार रुपये पेन्शन मिळते. केंद्र सरकारच्या या योजनेत देशातील नागरीक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. या योजनेसाठी देशातील कोणताही नागरिक अर्ज करू शकतो atal pension yojana

अटल पेन्शन योजनेत 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतो. या योजनेत किमान 20 वर्षे मासिक पैसे जमा करणे बंधनकारक आहे. प्रत्येक महिन्यात किती योगदान द्यायचे हे लाभार्थ्यांच्या वयावर अवलंबून असते.

  • वयाच्या 18 व्या वर्षी 5000 महिन्यांच्या पेन्शन मर्यादेसाठी, दरमहा 210 रुपये द्यावे लागतील
  • वयाच्या 25 व्या वर्षी दरमहा 376 रुपये द्यावे लागतील
  • 30 वर्षे वय असलेल्यांसाठी 577 रुपये दरमहा द्यावे लागतील
  • 35 वर्षांच्या लोकांसाठी 902 रुपये दरमहा द्यावे लागतील
  • 39 वर्षे वयाच्यांसाठी 1318 रुपये दरमहा द्यावे लागतील