ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अवाजवी वीजबिल पाठवून त्रास देऊ नका आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निर्देश

विजबील घेऊन ग्राहक पोहोचले वार्षिक आमसभेत

मुलचेरा: येथील वीज वितरण विभागाच्या वतीने अवाजवी बिल पाठवीने, वीज खंडित करणे, ग्राहकांना नाहक त्रास देणे सुरू असल्याचा आरोप करत काही ग्राहक चक्क वीजबिल घेऊन वार्षिक आमसभेत पोहोचले.आमसभेत ग्राहकांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलाच रोष व्यक्त केल्याने अवाजवी बिल पाठवून नागरिकांना त्रास देऊ नका असे निर्देश आ धर्मराव बाबा आत्राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.मुलचेरा पंचायत समितीच्या प्रांगणात गुरुवार 23 फेब्रुवारी रोजी आ धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक आमसभा घेण्यात आली,यावेळी नागरिकांच्या वीज वितरण विभागावरील रोष आणि तक्रार पाहून त्यांनी हे निर्देश दिले.एकंदरीत मुलचेराची वार्षिक आमसभा वीज वितरण विभागावर चांगलीच गाजली.

वार्षिक आमसभेत धर्मराव बाबा आत्राम यांनी आरोग्य,वीज वितरण विभाग,वन विभाग,एस टी महामंडळ,ग्रामीण पाणीपुरवठा आदी विभागांचा आढावा घेतला आणि घरकुल बांधकामाची स्थिती जाणून घेतली.त्यानंतर उपस्थित नागरिकांच्या तक्रारी स्वीकारले..त्यात आरोग्य विभागाच्या विषयावर बोलण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी उपस्थितच नव्हते.लगाम परिसरातील नागरिकांनी लगाम प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तालुका आरोग्य अधिकारी विषयी भर सभेत आमदारांकडे तक्रार केली.यावर आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी नाराजी व्यक्त केली.त्यानंतर बरेच गावातील नागरिकांनी वीज वितरण विभागातील अवाजवी वीज बिल आणि वीज खंडित करून ग्राहकांना देत असले नाहक त्रास याबाबत चक्क वीज बिल दाखवत रोष व्यक्त करताच आमदारांनी संबंधित आलापल्ली आणि मुलचेरा च्या अधिकाऱ्यांना चांगलाच धारेवर धरले.

तत्पुर्वी पाहुण्यांचे आगमन होताच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून मान्यवरांचे शॉल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी तालुक्यातील विविध संघटनांकडून आ धर्मराव बाबा आत्राम यांचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर तालुका कृषी विभागाकडून मुलचेरा तालुक्यातील स्ट्रॉबेरी विक्रीचा शुभारंभ आ धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम,जिल्हा नियोजन समिती सदस्य ऋतुराज हलगेकर,तहसीलदार कपिल हाटकर, गटविकास अधिकारी एल बी जुवारे,माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,माजी सभापती सुवर्णा येमुलवार,माजी उपसभापती प्रगती बंडावार,रंजित स्वर्णकार,विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, उपसरपंच आणि तालुक्यातील विविध गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वार्षिक आमसभेचे प्रास्ताविक येथील गटविकास अधिकारी एल बी जुवारे,आभार गटशिक्षणाधिकारी गौतम मेश्राम यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक महेश मुक्कावार यांनी केले.