गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुलचेरा आयटीआय चे प्रशिक्षणार्थी धावणार ‘रन फॉर स्किल’ स्पर्धेत..

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलचेरा मध्ये  शिकणारे प्रशिक्षणार्थी आता ‘कौशल्य प्रशिक्षणाचे महत्त्व’ याबाबत जागृती करण्यासाठी धावणार आहेत.  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने राज्यभरातील आयटीआयमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी येत्या रविवारी (ता.१७) ‘रन फॉर स्किल’ या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली १९ जुलै २०२३ रोजी बैठक झाली. बैठकीत युवकांमध्ये कौशल्य प्रशिक्षणाचे महत्त्व वृद्धिंगत करण्यासाठी संपूर्ण राज्यात ‘रन फॉर स्किल’ संकल्पनेवर आधारित मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले. त्या अनुषंगाने आयटीआय मुलचेरा मध्ये मॅरेथॉन स्पर्धा दिनांक १७/०९/२०२३ ला  व्यवसाय आणि कौशल्य अभ्यासक्रमांची जागृती व्हावी, या उद्देशाने रविवारी सकाळी सात ते आठ या वेळेत ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून अथवा नजीकच्या  ठिकाणापासून स्पर्धेची सुरवात करून पाच किलोमीटरपर्यंत स्पर्धा आयोजित केली आहे.
स्पर्धेमध्ये संस्थेतील सर्व मुले-मुली प्रशिक्षणार्थी सहभागी व्हावे असे सस्थेचे प्राचार्य श्री. आर. एस. देठेकर यांनी आवाहन केले आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार रुपये, दोन हजार रुपये आणि एक हजार रुपये यांसह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी महिती संस्थेचे सर्वसाधारण प्राचार्य श्री. ए. डी. शेंडे दिली आहे.
मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे शिल्प निदेशक श्री. एस. ए. फुले, श्री. पी. एच. फटिंग, के.के.खूने, एस. बी. तालावार, डी.सी. धकाते, आर.जे. मेहेर, डी. यु. काटकर तसेच निदेशिका एच. के. कंनाके, एम. के. मेश्राम नियोजन करणार आहेत.