मुंबई, दि. 19 : तबस्सुम यांच्या निधनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका आणि मुलाखतकार आपण गमावली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, बाल कलाकार म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या तबस्सुम यांनी रसिकांच्या मनात आपले स्वतःचे एक विशिष्ठ स्थान निर्माण केले होते. एक चांगल्या मुलाखतकार म्हणून त्यांनी अनेक नव्या कलाकारांची ओळख करून दिली होती. एक विनोदी लेखिका म्हणूनही त्या सर्वपरिचित होत्या. संपादिका म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केले. ‘फुल खिले हैं गुलशन गुलशन’ हा 21 वर्षे चाललेला दूरदर्शनवरील कार्यक्रम कोणीही विसरू शकणार नाही. त्यांच्या निधनाने एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.
00000
