ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुलचेरा तालुक्यात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

मुलचेरा, दि. १ — महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज सायंकाळी सहा वाजता मुलचेरा तालुक्यात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय, प्रशासनातील त्यांची मजबूत पकड, स्पष्टवक्तेपणा आणि जनतेशी असलेले जवळचे नाते यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वामुळे राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली असून विकासाभिमुख भूमिका ही त्यांची ओळख राहिल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले.

श्रद्धांजली कार्यक्रमात युधिष्ठिर दादा बिस्वास, अपूर्व मुजुमदार, बादलजी शाहा, प्रकाश दत्ता, काशीनाथ कन्नाके, दिलीप आत्राम, मनोज बंडावार, विद्युत मंडल, हिमांशु हलदार, मनोज कर्माकार, गोविंद बाला,विष्णु रॉय यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान दोन मिनिटे शांतता पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली.

सर्वपक्षीय पातळीवर आयोजित या श्रद्धांजली सभेमुळे मुलचेरा तालुक्यात एकात्मतेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे वातावरण गंभीर व भावनिक होते. उपस्थितांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली वाहिली.