ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने काकडयेली जवळ ट्रकचा अपघात

धानोरा:-
धानोरा वरून७किलोमीटर अंतरावर असणाऱ्या काकडयेली या गावाजवळ आज दिनांक १६/१०/२०२२रोज रविवार ला छत्तीसगड वरून गडचिरोली जानार्या ट्रक ड्रायव्हर चे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात सुदैवाने जिवित झालि टळलि. मिळालेल्या प्राप्त माहीति नुसार आज दिनांक 16/10/2022 ला पहाटेच्या वेळी CG19 BP 7741 क्रमांकाचा ट्रक छत्तीसगड वरून गडचिरोलिला जात असतानाच पहाटेच्या वेळी अंदाजे 3.00 वाजता ड्रायव्हरचा डोळा लागल्याने हा अपघात घडून आला सुदैवाने यात कोणतीही जीवित आणि झाली नाही हा ट्रक काकडयेली या गावाजवळील तलावामध्ये जाऊन घुसला.माञ कोणतिही जिवित हानी झालेली नाही.