गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

२० रुपयांत दोन लाखांचा विमा श्री व्ही पी कुरेकर शाखा व्यवस्थापक दि गडचिरोली डिस्ट्रिक्ट सेंट्रल को – ऑप बॅक गडचिरोली शाखा मुलचेरा

मुलचेरा: केंद्र शासनाच्या वतीने २०१५ पासून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना राबविली जात आहे. त्याअंतर्गत वार्षिक २० रुपयांत दोन लाखांचा विमा दिला जातो. प्रत्येक राष्ट्रीयीकृत बँकांकडून योजनेसाठी अर्ज दाखल केला जाऊ शकतो. प्रतिदिवसासाठी केवळ पाच पैसे अशा दराने विमा खर्च होत असल्याने सर्वसामान्यांसाठी ही योजना लाभदायक ठरत आहे.

२० रुपयांत दोन लाखांचा विमा

■ जेव्हा ही पीएम सुरक्षा योजना सुरु केली होती तेव्हा वार्षिक १२ रुपये प्रीमियम घेतला जात होता. त्यात आता वाढ झाली असून, या योजनेसाठी वार्षिक २० रुपये प्रीमियम घेतला जात आहे. या योजनेंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास विमाधारकास दोन लाखांचा विमा मिळतो. लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे.एकावेळीच विमा एकाच व्यक्तीचे चार-पाच बचत बँक खाते असते. त्यामुळे पीएम सुरक्षा विमा योजनेसाठी कोणत्याही एकाच बँकेतून विमा योजनेसाठी अर्ज करता येतो. १८ ते ७० वय असणारे नागरिक या विमा योजनेसाठी पात्र ठरतील.

काय आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना?

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ९ मे २०१५ रोजी सुरु करण्यात आली. जे नागरिक विम्याच्या कक्षेत आले नाहीत त्यांना विमा मिळावा यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. सर्वसामान्य व गोरगरीब लोकांचा या योजनेत समावेश करून घेण्यासाठीचा प्रयत्न केंद्र शासना- कडून केला जात आहे.

अटी काय?

■ हा विमा प्रत्येक राष्ट्रीय बँकेकडून काढला जाऊ शकतो. विमा काढण्यासाठी संबंधित बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

■ १ जून ते ३१ मे असा विमा योजनेचा कालावधी असतो. ऑफलाइन किंवा ऑनलाइन विमा काढता येतो.

विमा विषयी सविस्तर माहिती तालुक्यातील गाव पातळीवर वर पोहचवण्याचे कार्य श्री व्ही पी कुरेकर शाखा व्यवस्थापक दि गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली श्री नरेश गलबले निरीक्षक,दि गडचिरोली डिस्ट्रिक्ट सेंट्रल को – ऑप बॅक गडचिरोली शाखा मुलचेरा यांनी गावपातळीवर सभा घेऊन मार्गदर्शन करीत आहे.