मुलचेरा:-
तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील गावोगावी वानराई बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून त्या अंतर्गत कोपरअली सर्कल अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कृषी सहायक प्रदीप मुंडे यांनी शेतकऱ्यांना वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन केले असून यापासून आपणास एक सुरक्षित सिंचनाची सोय रब्बी हंगामा करता होईल व आपल्या होणाऱ्या उत्पादनात नक्कीच वाढ होईल त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लोकसहभागातून लोकांकरिता वनराई बंधारे तयार करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी लाभान तांडा येथे वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली यावेळी देविदास बनवत वसंत बोडा मनीष बोडा विनोद भानोट तसेच गावातील इतर शेतकरी उपस्थित होते इतर सर्व गावातही जनजागृती करून वनराई बंधारे बांधण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले व तसेच कृषी विभागाच्या विविध योजना विषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली