- महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेच्या अंतर्गत मिळणारे विमा संरक्षण १.५० लाखांहून ५ लाख रुपये करण्यात आलं आहे. त्यामुळं आता ५ लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार आहेत. या योजनेत नवीन २०० रुग्णालयांचा समावेश केला जाणार आहे.
- मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मिळणारे आर्थिक साहाय्य २.५० लाखांहून ४ लाख करण्यात आलं आहे.
- राज्यभरात ७०० स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने स्थापन करण्यात येणार
- राज्यात सुरू असलेल्या २६८ सिंचन प्रकल्पांपैकी ३९ प्रकल्प यावर्षी पूर्ण करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली. यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील ६ प्रकल्प, बळीराजा जलसंजीवनी योजनेतील २४ प्रकल्पांचा समावेश आहे.
- गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास यावर्षी १५०० कोटी देणार. जून २०२४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करणार – फडणवीस
- कोकणच्या सिंचन सुविधांसाठी विशेष कृती कार्यक्रम आखणार, खारभूमी बंधार्यांच्या कामांना गती देणार – फडणवीस
- केंद्र उत्पन्नवाढीसाठी कोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्र सुरू करणार. त्यासाठी २०० कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड स्थापन करण्यात येणार.
- कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना राबवणार. त्यासाठी पुढील ५ वर्षांसाठी १३२५ कोटी रुपयांची तरतूद – फडणवीस