आज मूलचेरा तालुक्यात निघाली भव्य बाईक रॅली
मूलचेरा:
सक्षम भारताची विकसित मोदी@९ वर्ष महाजनसंपर्क अभियान अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा मूलचेरा यांच्या वतीने आज दिनांक 26 जुन रोजी सोमवारला सकाळी 10 वाजता शेकडो यूवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बाईक रॅली मध्ये सहभाग घेवून मोदी सरकारचे नऊ वर्ष हे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण करीता केलेले कार्य होय यांची जनजागृती युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मूलचेरा शहरातील नेताजी सुभाषचंद्र चौकातून ते गोमानी या गावापर्यंत बाईक रॅलीच्या माध्यमातून मोदी सरकारच्या ९ वर्षाच्या कार्याचा प्रचार व प्रसार केला,हर हर मोदी,घर-घर मोदी,भारत माता की जय, म्हणत संपूर्ण वातावरण दुमदुमून गेला.
यावेळी जिल्हा परिषद गडचिरोलीचे माजी अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांनी बाईक रॅलीमध्ये उपस्थित असलेल्या युवा वर्गाला व गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की मोदी सरकार चे शासन हे भारत देशाला सुजलाम सुफलाम करणारे शासन असून भारताला विश्वगुरू बनविण्याकरिता मोदी सरकारची पुन्हा आवश्यकता असल्यामुळे जनतेने मोदी सरकारला निवडून द्यावे असे आव्हान त्यांनी केले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा जिल्हा परिषद गडचिरोलीचे माजी अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संजीव सरकार, तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता, जिल्हा सचिव बादल शाह, तालुका उपाध्यक्ष विजय बिश्वास, तालुका उपाध्यक्ष युवा मोर्चा किशोर मल्लिक,जिल्हा सचिव सुभाष गणपती, नगरसेवक दिलीप आत्राम,युवा नेते गणेश गारघाटे, पवन आत्रण, अक्षय चौधरी,शुभम कुत्तरमारे तसेच भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी मोठ्या उत्साहात उपस्थित होते.