ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा – आता पेट्रोल-डिझेल नाही तर, इथेनॉलवर चालणार सर्व गाड्या

देशातील प्रदूषण, पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्यासाठी केंद्र सरकार इथेनॉल इंधन आणण्याचे प्रयत्न करत आहे, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

पहा काय म्हणाले नितीन गडकरी

 उद्या 29 ऑगस्टला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इथेनॉल इंधनावर चालणारी टोयोटाची इनोव्हा कार सादर करणार आहेत. ही कार 100 टक्के इथेनॉलवर चालणार आहे.

 ही कार जगातील पहिली BS-6 स्टेज-2 विद्युतीकृत फ्लेक्स-इंधन आधारित वाहन असेल. या कारचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे ही कार इथेनॉलसह हायब्रिड प्रणालीवर 40 टक्के वीज निर्मिती करेल त्याचाही प्रवासासाठी वापर करता येईल.

कसे तयार होते इथेनॉल

 स्टार्च आणि साखरेच्या किण्वातून इथेनॉल तयार होते. हे एक प्रकारचे अल्कोहोल असते. पेट्रोलमध्ये मिसळून ते वापरण्यात येते. ऊसाच्या रसापासून, मका, बटाटे, कुजलेला भाजीपाला, स्टार्चयुक्त पदार्थातून इथेनॉल तयार करण्यात येते.