ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांची मोठी घोषणा ! – भारतात तयार होणार आयफोन

TATA ग्रुप लवकरच भारतात Apple iPhone चे उत्पादन सुरू करणार आहे. टाटा ग्रुप स्थानिक आणि जागतिक बाजारपेठेसाठी हे उत्पादन सुरू करेल, अशी माहिती केंद्रीय इलक्ट्रॉनिक आणि टेक्नॉलॉजी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली आहे. 

यापूर्वी जगभरात विकले जाणारे बहुतांश आयफोन चीनमध्ये तयार केले जात होते. मात्र आता भारतात आयफोनचे उत्पादन सुरू झाले आहे. 

पहा काय सांगितले राजीव चंद्रशेखर यांनी

 टाटाने भारतात आयफोन निर्मितीसाठी तैवानची कंपनी विस्ट्रॉन कॉर्प विकत घेतली आहे. विस्ट्रॉन कॉर्प अँपलची सप्लायर कंपनी आहे.

 विस्ट्रॉन कॉर्पच्या काल झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत इतर सहयोगी कंपन्यांनी या कराराला मान्यता दिली आहे. 

त्यानुसार टाटा कंपनीला विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंगमधील दोन्ही कंपन्यांचे १०० टक्के शेअर्स मिळणार आहेत.