देशातील सर्व शैक्षणिक संस्थांमधून पदवी शिक्षण आता तीन नाही तर चार वर्षांचे होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत चार वर्षाच्या पदवीचा आरखडा तयार करण्यात आला असून , हा आरखडा देशातील सर्व विद्यापीठात पुढील आठवड्यात पाठवला जाणार आहे.
पहा काय सांगितले आयोगाने ?
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पदवीची चार वर्षे केली असले, तरी विविध विद्यापीठाना त्यांच्या कार्यपद्धतीनुसार त्यांचे नियम बनवण्यासाठी सूट देण्यात येणार आहे.
तसेच जे विद्यार्थी विद्यापीठात पहिल्या वर्षासाठी किंवा द्वितीय वर्षात आहेत, त्याना या नव्या अभ्यासक्रमाचा पर्याय खुला असणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून हा नियम पुढील वर्षापासून लागू करण्यात येणार असला , तरी यूजीसीने विद्यार्थ्यांकडे तीन वर्षाच्या पदवीचाही पर्याय असणार आहे.