राज्यातील शिक्षकांची पदभरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे संचमान्यता सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे देखील तातडीने भरण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन लागू करण्यात आले आहे. अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन करण्यात आले आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनात देखील भरघोस वाढ करण्यात आली आहे. अन्य मागण्यांबाबत देखील शासन सकारात्मक असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.
Related Articles
सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ स्पर्धेत ६७ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग; १५ नोव्हेंबरपर्यंत स्पर्धेत सहभागाची संधी
आयटीआयच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या ‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. कालपर्यंत तब्बल 67 हजार 990 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मागील काही वर्षांपासून आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असून […]
माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन *रामंजपूर वासीयांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी* *सिरोंचा:-* तालुक्यातील जानमपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट रामंजपूर येथे नळ पाणीपुरवठा योजनेचे माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. रामंजपूर येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते.मागील अनेक दिवसांपासून […]
राज्य शासन शिक्षकांच्या वाढीव अनुदानाचा प्रश्न सोडविणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
आंदोलन मागे घेण्याचे शिक्षण मंत्र्यांचे आवाहन मुंबई, दि. 2 :- घोषित शाळांतील शिक्षकांच्या वाढीव टप्पा अनुदानाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल आणि मुख्यमंत्री येत्या 15 नोव्हेंबर रोजी याबाबतचा निर्णय जाहीर करतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. या अनुषंगाने संबंधित शिक्षकांनी सुरू असलेले […]