गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

मोहुर्ली येथे वीर बाबुराव शेडमाके यांची शहिद दिवस साजरा

मुलचेरा :-

तालुक्यात मोहुर्ली येथे २१ऑक्टोबर रोजी  वीर बाबुराव शेडमाके शहिद दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.विकास नैताम नगराध्यक्ष नगरपंचायत मुलचेरा कार्यक्रमाचे उदघाटन श्री तालांडे साहेब नायब तहसीलदार तहसील कार्यालय मुलचेरा यांच्या हस्ते करण्यात आला.प्रमुख पाहुणे दिनेश पेंदाम,श्री.कुळमेथे साहेब,श्री पवन आत्राम,प्रभाकर मडावी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.विकास नैताम नगराध्यक्ष नगरपंचायत मुलचेरा यांनी शहिद वीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवनावर प्रकाश टाकले. तसेच उदघाटन श्री तालांडे साहेब नायब तहसीलदार यांनी शहिद वीर बाबुराव शेडमाके यांनी जनतेसाठी केलेल्या कार्यबद्दल पटवून सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन बाळू मेश्राम यांनी केले