मुंबई, दि.१९: : अनेक दशकं हिन्दी सिनेसृष्टी आणि दूरदर्शन वर अधिराज्य गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांच्या निधनाने कला आणि चित्रपट क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे शब्दात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तबस्सुम यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
तबस्सुम म्हणजे हास्य चैतन्य आणि सुगंध. अगदी नावाप्रमाणे आयुष्य व्यतीत करुन इतरांना “फूल खिले हैं गुलशन गुलशन” च्या मुलाखतीत खुलविणाऱ्या उत्तम मुलाखतकार होत्या. भारतीय रसिक प्रेक्षक त्यांचा हसरा चेहरा आणि सिने सृष्टीतील योगदान कधीच विसरू शकणार नाही. इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारी अभिनेत्री गमावल्याची दुःख होत असून तबस्सुम यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
