महाराष्ट्र शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी, नागरिकांसाठी सतत नवनवीन योजना राबविल्या जातात. नुकतीच ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यामार्फत घोषणा करण्यात आलेली नवीन योजना म्हणजे विलासराव देशमुख अभय योजना. महावितरण या वीज पुरविण्याच्या कंपनीचे सध्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने 9 हजार कोटी रुपयांची थकबाकी असणाऱ्या कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकाकडून ही वसुली करून घेण्यासाठी विलासराव देशमुख अभय योजना अमलात आणण्यात आली आहे.
या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना ज्या ग्राहकाचा वीज पुरवठा कायम खंडित करण्यात आलेला आहे, अशा ग्राहकांना थकीत बिलामध्ये सवलत देऊन नव्याने त्यांना वीज पुरवठा दिला जाणार आहे. ज्यामुळे राज्यातील पूर्णत: बंद झालेली उद्योग, व्यवसाय, कृषी क्षेत्रातील कामे, घरगुती वीज कनेक्शन यांना चालना मिळणार आहे परिणामी एकप्रकारे रोजगारसुद्धा उपलब्ध होणार आहे. या शासनाच्या उपकरणामुळे ग्राहकमार्फत वीज बिलाचे पैसे भरल्यास, महावितरण ला कोळसा टंचाई इथून मार्ग सापडणार आहे. अन्यथा भारनियमनाशिवाय दुसरा पर्याय नाही असे सुद्धा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यामार्फत वक्तव्य करण्यात आले.
विलासराव देशमुख साहेब हे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांचा गावपातळीवरून चालू झालेला सरपंच पदापासून ते मुख्यमंत्रिपदापर्यंत आणि नंतर केंद्रीयमंत्री अशा प्रकारचा एकूण प्रवास उल्लेखनीय आणि कौतुकास्पद राहिला आहे. राज्याचा आणि राज्यातील नागरिकांच्या बाबतीत त्यांचा कायम व्यापक दृष्टिकोन राहिला आहे. राज्यातील विकसित भाग विकसनशील व्हावा आणि मागास भाग विकासाच्या बरोबर असावा या दृष्टिकोनातून ते नियोजन आखत असत. त्यांच्या अश्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रभावशाली विचारसरणीमुळे ते महाराष्ट्रामध्ये लोकनेते म्हणून ओळखले जातात.
त्यामुळेच त्यांचे स्मरण म्हणून या योजनेचे नाव विलासराव देशमुख अभय योजना असे देण्यात आले आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यामार्फत देण्यात आली. महावितरणमध्ये जवळपास ३ कोटी वीज ग्राहक असून यामध्ये LT आणि HT ग्राहकांचा समावेश आहे.
महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना
या योजनेमुळे राज्यातील जवळपास ३२ लाख ग्राहकांना परत वीज जोडणी मिळणार आहे. त्यासाठी ग्राहकांना थकबाकीची मूळ रक्कम एकरकमी भरावी लागणार आहे. ज्यामुळे त्यांच्या थकबाकीवरील व्याज व विलंब शुल्क १०० टक्के माफ करण्यात येईल.
या योजनेचा कालावधी १ मार्च २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत असून ही योजना कृषी ग्राहक म्हणजेच शेतकरी वर्ग वगळता इतर सर्व वर्गवारीसाठी लागू असणार आहे
विलासराव देशमुख अभय योजना महत्त्वाचे पॉइंट्स
- कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद झालेल्या ग्राहकांना थकीत रकमेत सवलत देणारी नवीन योजना
- कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद झालेले एकूण ग्राहक – ३२,१६,५००
- एकूण थकबाकी – ९,३५४ कोटी
- थकबाकीची मूळ रक्कम – ६,२६१ कोटी
अभय योजना ठळक वैशिष्ट्ये
- थकित रक्कम एकरकमी भरणाऱ्या ग्राहकांना अधिकची सवलत
- सुलभ हप्त्यात थकबाकी भरण्याची सोय
- फेरजोडणीचा लाभ
विलासराव देशमुख अभय योजनेचे फायदे
- ३२ लाख वीज ग्राहकांना परत वीज जोडणी मिळणार
- व्यावसायिक व औद्योगिक आस्थापना पुन्हा सुरू होणार
- व्यवसाय चालू झाल्याकारणाने मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार
- थकबाकी वसूल होऊन महावितरणच्या आर्थिक स्थितीमध्ये बदलाव येणार