अहेरी येथील सामूहिक विवाह सोहळ्यात ६१ आदिवासी जोडपे विवाहबद्ध, लोकांची तुडुंब गर्दीआदिवासी समाजाचे प्रेरणास्थान शहीद विर बाबूराव शेडमाके यांच्या १९० व्या जयंतीचे औचित्य साधून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पुढाकाराने अहेरी येथील ऐतिहासिक हॉकी ग्राऊंड येथे सामूहिक विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाले, ह्या दिमाखदार विवाह सोहळ्यात अहेरी विधानसभा क्षेत्रातील ६१ आदिवासी जोड़पे विवाहबद्ध झाले, तसेच ह्याप्रसंगी नवनिर्मित सल्ला गांगराचे विधिवत पूजन करून लोकार्पण करण्यात आले, ह्यावेळी अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध गावांतुन आलेल्या लोकांची तुडुंब गर्दी झाली होती..!
ह्याप्रसंगी उद्घाटक मनुन बोलतांना राजे अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले शहीद विर बाबुराव शेडमाके यांनी अन्याय, अत्याचार, असत्य ह्या विरुद्ध सामान्य जनतेसाठी इंग्रजांशी लढा देत आपल्या अतिशय कमी वयात आपल्या प्राणांची आहुती दिली होती हे आदिवासी समाजाला कदापी विसरता येणार नाही त्यांचे त्याग, बलिदान आणि वैभवशाली इतिहासाचे भावी पिढीला स्मरण व्हावे ह्यासाठी विर बाबुराव शेडमाके यांचे जन्मगाव अहेरी तालुक्यातील किष्टापूर (दौडगीर) येथे त्यांचे महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे स्मारक उभारणार असल्याचे राजेंनी ह्यावेळी घोषित केले तसेच ह्यासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिली असून लवकरच नियोजित २ एकर जागेवर भव्य स्मारकाचे भूमिपूजन करू असे प्रतिपादन ह्यावेळी राजे साहेबांनी केले..!!
ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मा.धर्मराव बाबा आत्राम होते तर प्रमुख अतिथी म्हणून अहेरीचे नगराध्यक्षा रोजा करपेत, प्रकाश गुडेल्लीवार, बबलू हकीम, शाहीन हकीम, राहुल कलाटे,रमेश हलामी, पोलीस निरीक्षक मानभाव साहेब, प्रदीप सडमेक, भाजपा तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, अमोल गुडेल्लीवार, पितांबर कुडमेथे, नगरसेवक विकास उईके, दशरथ कोरेत, संजय तोरे, विकास तोडसाम सहित जय पेरसापेन गोंड समाज बहूउद्देशीय मंडळ, अहेरीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते