महाराष्ट्र विदर्भ

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ हवा, २ जुलैपर्यंत करा अर्ज डॉ. विनोद म्हशाखेत्री तालुका आरोग्य अधिकारी मूलचेरा

मातामृत्यू, बालमृत्यू,दरात घट करण्यासाठी आहे योजना

मुलचेरा: माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित केले जात आहे. त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केलेली आहे.

ग्रामीण भागात जनजागृती व्हावी

योजनेंतर्गत मातृत्व वंदना आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात

महिलांना लाभ दिला जात असला तरी ग्रामीण जनजागृतीचा अभाव आहे. आशा वर्कर, परिचारिका यांच्या मार्फत महिलांना सांगितले जाते. परंतु बहुतांश महिला अर्ज सादर करीत नाहीत.

कोणला दिला जातो लाभ?

या योजनेचा लाभ पहिल्या जिवंत अपत्यांसाठी ५ हजार रुपयांचा दोन टप्प्यात तसेच दुसरे अपत्य मुलगी जन्मल्यास ६ हजार रुपयांचा लाभ एकाच टप्प्यात थेट आधार लिंक व डीबीटी (एनपीसीआय) लिंक असलेल्या खात्यात जमा केली जाते. ही योजना शासकीय सेवेत, खासगी सेवेत किंवा ज्या मातेला ६ महिन्यांची प्रसूती रजा मंजूर आहे अशा माता वगळून इतर सर्व मातांना देय आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेचा

जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी मंत्रालय महिला व बालकल्याण विभाग नवी दिल्लीद्वारे १८ जून ते २ जुलै या कालावधीत ऑनलाइन लाभार्थी नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात पहिले अपत्ये व दुसरे अपत्य मुलगी असलेल्या पात्र लाभार्थ्यांसाठी १८ जून ते २ जुलैपर्यंत विशेष ऑनलाइन फॉर्म भरण्याची मोहीम सुरू असल्याचे डॉ. विनोद म्हशाखेत्री तालुका आरोग्य अधिकारी तालुका मूलचेरा यांनी कळविले आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.० राज्यात ९ ऑक्टोबर २०२३ लागू झाली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील आशा वर्कर आरोग्य सेविकांमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सर्व आरोग्य सेवा कार्यक्षेत्रांमध्ये ऑनलाइन नवीन लाभार्थी नोंदणी व पोस्टाचे इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते उघडणेबाबत अभियान राबविण्यात येणार आहे.

लाभासाठी हे आहेत निकष – योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांच्या आत असावे. यासाठी तहसीलदारांचे उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे लागेल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांना जात प्रमाणपत्र जोडावे लागेल. दिव्यांग महिलांसाठी किमान ४० टक्के दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. बीपीएल शिधापत्रिकाधारकांसाठी त्यांच्या नावाचे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थी ई-श्रम कार्ड धारण करणाऱ्या महिला, किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी, मनरेगा जॉब कार्ड घेतलेल्या महिला.