ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

भारत कुठून करतोय सोन्याची खरेदी?

नवी दिल्ली,

भारत जगातील सर्वात जास्त सोने आयात gold demand करणारा देश असून, सोन्याच्या आयातीत चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. आपल्या देशात विशेषत: सणासुदीला सोन्याची मागणी जास्त प्रमाणात असते. gold demand गेल्या पाच वर्षांचे आकडे बघितले तर भारतीयांनी वर्ष २०२१ मध्ये सर्वात जास्त सोने खरेदी केले होते. gold demand आपल्याकडे सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. नागरिकांची दिवाळीची तयारी जोरात सुरू असून, धनत्रयोदशीला सोन्याची खरेदी करण्याची परंपरा अनेकांकडे आजही पाळली जाते. gold demand in Dhanteras धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून, सोन्याचांदीचे दागिने खरेदी करण्यावर सगळ्यांचा भर असतो. gold demand पण, आपण दुकानातून जे सोने विकत घेतो, ते दुकानात तरी कुठून येते? भारत एका लहानशा देशाकडून सोने खरेदी करतो.

भारतात सणासुदीला सोन्याचे दागिने करण्याला प्रचंड महत्त्व दिले जाते. gold demand केवळ सौंदर्यात भर घालण्यासाठीच नाही तर गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणूनही सोन्याला पसंती मिळते. जेव्हा जगभरातील रोखेबाजार पडतो किंवा मंदीची लाट येते तेव्हा सोन्याच्या मागणीत वाढ झालेली दिसते. gold demand या बाबतीत भारतीय सर्वाधिक आघाडीवर आहेत. आपल्या गरजेच्या ५० टक्के सोन्याची खरेदी भारत स्वित्झर्लंडकडून करतो. स्वित्झर्लंडशिवाय भारत संयुक्त अरब अमिरात UAE, दक्षिण आफ्रीका South Africa, गिनी Gunia आणि पेरू Peru यासारख्या देशांकडूनही सोन्याची आयात करतो. आर्थिक वर्ष २०२१ ते २०२२ या काळातील सोन्याच्या आयातीवर नजर टाकली तर लक्षात येते की, या कालावधीत भारताने सर्वाधिक सोन्याची आयात ४५.८ टक्के सोने फक्त स्वित्झर्लंडहून आयात केले आहे. gold demand त्यानंतर, साडे सतरा टक्के सोन्याची आयात संयुक्त अरब अमिरातमधून केले आहे. विभिन्न देशांमधून आयात केलेले हे सोने प्रामुख्याने दिल्ली Delhi आणि चेन्नई Chennai या शहरांमध्ये जाते. तिथून मग देशाच्या इतर शहरांमध्ये सोन्याचा पुरवठा केला जातो.

gold demand युरोपातील लहानसा देश असलेला स्वित्झर्लंड गेल्या अनेक वर्षांपासून भारताला सोने आयात करण्यात अग्रक्रमावर आहे. यांमागचे कारण म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये जगातील सर्वात मोठी गोल्ड रिफायनरी आहे. gold demand म्हणूनच स्विस सोन्याची गुणवत्ता जगातील दतर देशांमधील सोन्यापेक्षा चांगली आहे. gold demand केवळ भारतच नाही तर इतर देशदेखील स्वित्झर्लंडकडून सोने आयात करण्यास प्राधान्य देतात. कोरोनाकाळात भारतियांच्या सोन्याच्या मागणीत घट झाली होती. gold demand मात्र, वर्ष २०२१ मध्ये ही आकडेवारी पुन्हा वाढली आहे. वर्ष २०२० मध्ये ४३० टन सोन्याची आयात करण्यात आली. पण, वर्ष २०२१ मध्ये सोन्याची आयात वाढून १,०६८ टनांवर पोहचली आहे. यावर्षी देखील सोन्याच्या आयातीत वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. gold demand दुसरीकडे, भारतात तयार झालेल्या दागिन्यांची मागणी जागतिक स्तरावर वाढली असून गेल्या सप्टेंबरपर्यंत भारताने ३०,१९५ कोटी रुपयांच्या दागिन्यांची निर्यात केली आहे.