मुलचेरा, 13, ऑक्टोबर १३ ऑक्टोबर हा दिवस जागतिक नैसर्गिक आपत्ती निवारण वा जोखीम कपात वा घट दिवस म्हणून साजरा करण्यात येती दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी हा दिवस तहसील कार्यालय मुलचेरा येथे तहसीलदार मा. कपिल हटकर यांच्या मार्गदर्शनाख आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे आणि नेताजी सुभाष चंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा आणि राष्ट्रीय सेवा योजना संयुक्त विद्यमाने आज नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय ते तहसील कार्यालय पर्यंत जनजागृती काढून साजरा करण्यात आली.
आपती ही मानवी जीवनातील अपरिहार्य घटना आहे. ही आपत्ती नैसर्गिक व मानवनिर्मित अशा दोन प्रकारची असते व अतिवृष्टी, आग इ. नसर्गिक तर युद्ध दहशतवादी हल्ले, दंगली इ. मानवनिर्मित आपत्ती आहेत आणि आपण सर्व मिळून समाजाला मदत केली पाहिजे असे आवाहन मा कपिल हटकर तहसीलदार यांनी केले.
या रॅलीचे आयोजन राष्ट्रीय सेव योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा गौतम वाणी यांनी केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रणजीत मंडल यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरवात केली. या रॅलीमध्ये महाविद्यालयातील १०० विद्यार्थी शिक्षक डॉ शनवारे डॉ बाचेर आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.