गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

*युवकांनी स्वामी विवेकानंद यांची प्रेरणा घ्यावी- माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम* *शांतिग्राम येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न.!*

*युवकांनी स्वामी विवेकानंद यांची प्रेरणा घ्यावी- माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम*

*शांतिग्राम येथे भव्य खुले कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न.!*

*मूलचेरा:-* तालुक्यातील स्वामी विवेकानंद फॉउडेशन,शांतिग्राम यांच्या सौजन्याने भव्य खुले कबड्डी स्पर्धेचे आयोजन शांतिग्राम येथील ग्रामपंचायत पटांगणात करण्यात आले होते.

यावेळी भव्य खुले कबड्डी स्पर्धेचे उद्घाटक म्हणून माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे होते.उद्घाटन प्रसंगी बोलतांना ते म्हणाले आज 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिवस म्हणून संपूर्ण देशात व जगात साजरी केली जाते. स्वामी विवेकानंद यांनी आपले संपूर्ण जीवन सामाजिक कार्यासाठी समर्पित केले.त्यांनी केलेली कामे ही युवकांसाठी प्रेरणा देणारी आहेत.आजच्या युवकांनी त्यांची प्रेरणा घ्यावी असे मत यावेळी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केले.

यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भव्य खुले कब्बड्डी सामन्याला हजेरी लावली होती.
भव्य कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार 30001-/रु पुरस्कार माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून तर द्वितीय पुरस्कार 20001-/रु माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्या तर्फे देण्यात आले आणि तृतीय पुरस्कार 10001-/ रु माजी समाजकल्याण सभापती सौ.माधुरीताई संतोष उरेते यांच्या कडून देण्यात आला आहे.

तसेच यावेळी स्वामी विवेकानंद फॉउडेशन तर्फे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते स्थानिक मंदिराला पूजा साहित्य आणि खेळाडूला स्पोर्ट ड्रेस देण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे,प्रमुख अतिथी म्हणून शांतिग्राम सरपंच सौ.अर्चना बैरागी,माजी उपसभापती बासू मुजुमदार,सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ उरेते,भाजपा तालुका अध्यक्ष संजीव सरकार,भाजप महामंत्री विजय बिश्वास,सौरव पोद्दार,आशिष पोद्दार,निपुण शील,वैष्णव ठाकूर,निर्मल मंडल,नितेश पोद्दार,समर सरकार,कर्णधार मंडल,महेश तरफदार हे उपस्थित होते.