मार्च, २०१९ महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गाच्या पदभरतीबाबत दि. १० मे, २०२२ च्या शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व रिक्त पदे यापूढे सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच भरण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबधीत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्याबाबत तसेच, सदर परीक्षेच्या आयोजनासाठी गोळा झालेली सर्व माहिती (DATA) व परिक्षा शुल्क अनुक्रमे मे. न्यास कम्युनिकेशन प्रा.लि. व उप आयुक्त ( आस्थापना ), विभाग आयुक्त कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई तथा राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेण्याबाबत कळविण्यात आले आहे.
जिल्हा परिषद २०१९ गट-क भरतीचे वेळापत्रक व पदभरती बाबत शासन निर्णय जाहीर:
सदर पदभरती घेण्याच्या अनुषंगाने तसेच या बाबतच्या परिक्षा पारदर्शक व निः पक्षपाती पणे पार पाडण्याच्या दृष्टीने अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करण्याकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या अध्यक्षेते खाली अभ्यास गट स्थापन करण्यात आला होता. याबाबत सर्व जिल्हा परिषदांशी सल्लामसलत करून आरोग्य विभागाशी संबंधित गट क संवर्गातील पदभरती बाबत परिक्षेचे वेळापत्रक ठरविण्यात येऊन शासनास सादर करण्याबाबत अध्यक्ष, राज्यस्तरीय समन्वय समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांना कळविण्यात आले होते.
अध्यक्ष, राज्यस्तरीय समन्वय समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांनी शासनास सदर परिक्षेचे संभाव्य वेळापत्रक तसेच कृती आराखडा सादर केला आहे. सदर शिफारशींस अनुसरून माहे मार्च, २०१९ व माहे ऑगस्ट, २०२१ ( अपंग व इतर सुधारित आरक्षणासह ) च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अत्यारितील गट क मधील आरोग्य विभागाशी संबंधित ५ संवर्गातील पदभरती बाबत सर्व जिल्हा परिषदांना परीक्षेबाबतचे संभाव्य वेळापत्रक तसेच इतर सुचना कळविण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.
जिल्हा परिषद गट-क भरतीचे वेळापत्रक:
शासन परिपत्रक – मार्च, २०१९ व माहे ऑगस्ट, २०२१ ( अपंग व इतर सुधारित आरक्षणासह ) महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट – क मधील आरोग्य विभागाशी संबंधित ५ संवर्गातील पदभरती करण्याकरीता परिक्षा घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम ( वेळापत्रक ) पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.
मार्च, २०१९ व माहे ऑगस्ट, २०२१ ( अपंग व इतर सुधारित आरक्षणासह ) महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधीत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने उपरोक्त वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्यात यावी. सदर वेळापत्रक आपल्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच, कार्यालयातील दर्शनी भागात सर्वांच्या अवलोकनासाठी प्रसिद्ध करावे. सदर विषयाचे गांभिर्य तसेच तातडी लक्षात घेऊन उपरोक्त सुचनांचे तसेच, सामान्य प्रशासन विभाग व ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयातील सूचनांचे/पात्रतेच्या निकषांचे व शासन पत्रान्वये दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. यात कसूर केल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येवून शिस्तभंगविषयक कार्यवाही येईल, याबाबत आपल्या अधिनस्त सर्व संबंधितांना जाणीव करून द्यावी, असे निर्देश शासन निर्णयाद्वारे दिले आहेत.
ग्राम विकास विभाग शासन निर्णय: माहे मार्च, 2019 च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील पदभरती बाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.