आलापल्ली येते भाजपा अहेरी तालुका कार्यकारणी बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राजेंनी केले मार्गदर्शन
भाजपा अहेरी तालुका कार्यकरणीची बैठक काल आलापल्ली येतील ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झाली, ह्यावेळी समारोपीय भाषणांत बोलतांना माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम म्हनाले आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होहू शकतात, ह्या निवडणुकीत अहेरी तालुक्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी आपल्या क्षेत्रात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, जनतेशी थेट संपर्कात राहून त्यांची कामे करावी, केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनेची माहिती जनतेला द्यावे, काही अडचण आल्यास मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, केंद्रात आणि राज्यात आपले भाजपा सरकार असल्याने मी कोणाचाही भ्रमनिरास होहू देणार नाही अशी ग्वाही ह्यावेळी राजे साहेबांनी दिली..!!
ह्या बैठकीत अहेरी तालुक्यातील भाजपाचे संघटन, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका, धन्यवाद मोदीजी, मन की बात कार्यक्रमासहित सोशल मीडिया सह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, ह्यावेळी जिल्हा संघटन महामंत्री रवी ओलालवार,जेष्ठ नेते प्रकाश गुडेल्लीवार, आलापल्लीचे उपसरपंच विनोद अकंनपल्लीवार, तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, सोशल मीडिया जिल्हा संयोजक आनंद खजांची, भाजयुमो जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार, तालुका महामंत्री पोशालू सुधरी, मुकेश नामेवार, संतोष मद्दीवार, सतीश गोटमवार, सागर डेकाटे, शंकर मगडीवार, रमेश समुद्रालवार, अभिजित शेंडे, फ्रँकलीन सल्लम, विकास तोडसाम, सूचित कोडेलवार, नितीन गुंडावार, विकास उईके, विनोद जिल्हेवार, राकेश कोसरे सह अहेरी तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी, सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख सह भाजपा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.