ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्रातील १२ वर्षीय आदित्य ब्राह्मणेला मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार!, वाचा त्याची शौर्यगाथा

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील आदित्य विजय ब्राह्मणे याची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी देशभरातून 19 मुलांची निवड करण्यात येते. यामध्ये आदित्यचा देखील समावेश असून त्याच्या शौर्यासाठी मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

दिल्ली : अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाची (75th Republic Day) सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी (PM National Child Awards) महाराष्ट्रातील आदित्य विजय ब्राह्मणे (Aditya Vijaya Brahmane) याची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी देशभरातून 19 मुलांची निवड करण्यात येते. यामध्ये आदित्यचा देखील समावेश असून त्याच्या शौर्यासाठी मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नावीन्यपूर्ण कार्य, शैक्षणिक कामगिरी, क्रीडा, कला व संस्कृती, समाजसेवा आणि शौर्य या श्रेणींमध्ये दिले जाणारे पुरस्कार सोमवारी विज्ञान भवनात आयोजित समारंभात भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले गेले. यामध्ये महाराष्ट्रातून आदित्य विजय ब्राह्मणे याला त्याच्या शौर्यासाठी मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.