चामोर्शी:-भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका काँग्रेस चामोर्शी तर्फे भारत जोडो यात्रेनिमित्त नियोजन बैठक व तालुका काँग्रेस मेळावा दिनांक 13 नोव्हेंबर ला सांस्कृतिक भवन बाजार चौक चामोर्शी येथे दुपारी ११ वाजता आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक महेंद्र ब्राह्मणवाडे अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मारोतराव कोवासे माजी खासदार तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर नामदेव उसेंडी […]
Day: November 23, 2024
अनुदानित व विनाअनुदानित शिक्षण संस्थांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि.11 : राज्यातील अनुदानित व विनाअनुदानित शिक्षण संस्थांच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून त्याबाबत शिक्षण संस्था महामंडळामार्फत सुचविण्यात आलेल्या विविध सूचनांची दखल घेण्याबाबतचे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्री दिपक केसरकर यांनी दिले. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठकीचे आयोजन आज मंत्रालयात करण्यात आले होते. त्यावेळी श्री.केसरकर बोलत होते. यावेळी महाराष्ट्र […]
राज्यात उद्या १२ नोव्हेंबरला एकाच वेळी राष्ट्रीय लोक अदालत
मुंबई, दि.11 : राज्यातील उच्च न्यायालय व त्यांची सर्व खंडपीठे, जिल्हा व तालुका न्यायालये तसेच न्यायाधिकरण येथे उद्या शनिवार दि. 12 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या लोकअदालतीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दिनेश सुराणा यांनी केले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी […]
नवीन महाविद्यालय सुरू करताना रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा विचार करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 11 : नवीन महाविद्यालय सुरू करताना रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा विचार करून बहुपर्यायी अभ्यासक्रमाचे नियोजन महाविद्यालयाने करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी गठित केलेल्या मंत्रीगटासमोर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत सादरीकरण करण्यात आले. बैठकीला महसूल […]
इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी चोखपणे सुविधा द्याव्यात मुंबई, दि.११ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखो अनुयायींना यंदाही सोयी-सुविधा देताना सर्व यंत्रणांनी कोणत्याही त्रुटी राहू नयेत याची खबरदारी घ्यावी. इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करावे. यासाठी सामाजिक न्याय विभागाने तातडीने कार्यवाही करावी, […]
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘पुढारी हेल्थ आयकॉन’ पुरस्काराचे वितरण
आरोग्यविषयक योजनांचा लाभ देण्याचे राज्यपालांचे डॉक्टरांना आवाहन पुणे, दि.११ : प्रधानमंत्री आयुष्यमान योजना, प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना या सारख्या आरोग्य योजनांचा वंचित, गरीब, असाह्य घटकातील रुग्णांना लाभ देण्याचे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. पुढारी माध्यम समूहाच्यावतीने हॉटेल हयात येथे आयोजित ‘पुढारी हेल्थ आयकॉन पुरस्कार’ वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पद्मविभूषण डॉ.कांतीलाल संचेती, […]
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘एकात्म मानव दर्शन-संकल्पना कोश’चे प्रकाशन
पुणे दि.११ :- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सेंटर फॉर इंटिग्रल स्टडीज अँड रिसर्च संस्थेतर्फे प्रकाशित ‘एकात्म मानव दर्शन-संकल्पना कोश’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. जीवनाच्या विविध क्षेत्रात एकरूपता आणून भारताचा विश्वकल्याणाचा शाश्वत विचार जगाला देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे श्री.कोश्यारी यावेळी म्हणाले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत झालेल्या या कार्यक्रमाला दत्तात्रय होसबळे, नंद […]
‘सामाजिक व आर्थिक समालोचन-२०२२ ; मुंबई उपनगर जिल्हा’ पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई, दि. 11 : जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन 2022, मुंबई उपनगर जिल्हा या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई उपनगर च्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. जिल्हा सांख्यिकी कार्यालय, मुंबई उपनगर मार्फत सन 2021-22 साठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील विविध सामाजिक व आर्थिक बाबींसंबंधीची माहिती एकत्रित करुन जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, 2022 हे प्रकाशन तयार करण्यात आले आहे. […]
राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन
मुंबई, दि. 11 : नागरिकांमध्ये मतदानाबाबत शिक्षण आणि जाणीव जागृती करण्यासाठी काम करणाऱ्या माध्यम संस्थांना भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी माध्यम संस्थांनी अर्ज करावेत, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. चार गटांसाठी हे पुरस्कार आहेत. प्रिंट मिडिया, टेलिव्हिजन, रेडिओ आणि ऑनलाईन (इंटरनेट) सोशल मीडियासाठी हे […]
माजी सैनिकांची शारीरिक शिक्षण प्रशिक्षकपदी नेमणूक करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई दि. 11 : “माजी सैनिकांचे देशाच्या सुरक्षेसाठीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी प्राथमिक शाळांमध्ये शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षकपदी नेमणूक करावी. पात्र माजी सैनिकांना एक वर्षाचे क्रीडा आणि शारीरिक शिक्षणाचे विशेष प्रशिक्षण द्यावे”, असे निर्देश शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. शिक्षण विभागातील माजी सैनिक व शहीद सैनिक कुटुंबियांच्या समस्या व शिक्षक भरतीमध्ये माजी व शहीद […]