अहेरी:-पंचायत समिती अहेरी अंतर्गत येत असलेल्या महागाव (बूज) येथे नवीन ग्रामपंचायत भवनाचे थाटात लोकार्पण श्री. शंकर एन झाडे, श्री.नारायण गंगाराम अलोणे,श्री.व्येकटी गंगा वेलादी या जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महागाव (बूज) कु.पुष्पा दुर्गा मडावी सरपंचा, संजय चंद्राजी अलोणे उपसरपंच, विनायक लालू वेलादी सदस्य, लालू रामय्या वेलादी सदस्य, कु.दीपाली चंद्राजी कांबळे सदस्या, सौ.शोभा सुरेश तलांडे […]
Day: November 23, 2024
वन विभाग भरती वेळापत्रक जाहीर
भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना सामान्य प्रशासन विभागाने दि. ४/५/२०२२ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या आहेत. आता सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय दिनांक २१ / ११ / २०२२ अन्वये भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र […]
महाराष्ट्रातील ३ हजार कोटी रूपयांच्या अतिरिक्त प्रकल्पांच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ च्या पूर्वतयारी बैठकीत विविध महत्त्वपूर्ण मागण्या नवी दिल्ली, दि. 25 : महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती मिळण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या सुमारे 3 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त प्रकल्पांच्या प्रस्तावास मंजुरी प्रदान करावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे केली. येथील मानेकशॉ सेंटरमध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय अर्थसंकल्प : 2023-24 […]
नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत प्रवेश अर्ज करता येणार
मुंबई, दि. 25 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षण प्रवेश अर्जाची मुदत 27 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबईचे संचालक डॉ. के. एस जैन यांनी दिली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा […]
‘गुड समेरिटन’ पुरस्कार योजनेच्या आढाव्यासाठी राज्यस्तरीय देखरेख समिती
मुंबई दि. २५ : अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचविल्याबद्दल गुड समेरिटनला पुरस्कार देण्याच्या योजनेच्या योग्य अंमलबजावणीबाबत त्रैमासिक आढावा घेण्याकरिता राज्यस्तरीय देखरेख समितीची स्थापना गृह विभागाने शासन निर्णयाद्वारे केली आहे. केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शनास अनुसरून मोटार वाहनांच्या जीवघेण्या अपघातात अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीस तत्काळ मदत करणाऱ्या आणि अपघाताच्या सुरुवातीच्या काही तासात अपघातग्रस्तांना […]
अनुसूचित जाती, नवबौद्ध मुला-मुलींसाठी चेंबूर येथे शासकीय उच्चस्तर आयटीआय नूतन इमारतीचे संविधान दिनी उद्घाटन
मुंबई, दि. 25 : अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील मुला-मुलींसाठी मुंबई येथे विभागस्तरीय उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू होत असून यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मुंबई उपनगर जिल्ह्यात चेंबूर येथे नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. संविधान दिनाचे औचित्य साधून 26 नोव्हेंबर 2022 रोजी या इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते […]
राज्यात उद्यापासून ६ डिसेंबरपर्यंत ‘समता पर्व’चे आयोजन
मुंबई, दि. २५ : राज्यात २६ नोव्हेंबर संविधान दिनापासून ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनापर्यंत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘समता पर्व’ चे आयोजन केले जाणार आहे. या कालावधीत राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दि. २५ नोव्हेंबर रोजी समता पर्वाविषयी पत्रकार परिषदेचे आयोजन, दि.२६ नोव्हेंबर रोजी प्रभात फेरी, संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन, जिल्हास्तरावर पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे […]
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन तसेच बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्किटचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या होणार उद्घाटन – पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. 25 : “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत मुंबईतील महत्त्वाची स्थळे व बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्कीट तयार करण्यात आले आहे. संविधान दिनानिमित्ताने 26 नोव्हेंबर रोजी पर्यटन संचालनालयाने नव्याने तयार केलेल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट’ चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चेंबूरच्या दि फाईन आर्टस् सोसायटी येथे […]
जागतिक बँकेच्या संचालकांनी घेतली कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट
मुंबई, दि. 25 : जागतिक बँकेचे भारतातील संचालक ऑगस्टे तानो कौमे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने आज कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मंत्रालयात भेट घेतली. जागतिक बँकेच्या सहयोगातून राज्यात महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प राबविण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. जागतिक बँकेच्या प्रमुख शिक्षण तज्ज्ञ शबनम सिन्हा यांच्यासह कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातील वरिष्ठ […]
गोवर संसर्ग : पाच वर्षांखालील मुलांवर विशेष लक्ष द्यावे – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या सूचना
मुंबई, दि. २५ : गोवर संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घ्यावी. तसेच जिल्हानिहाय कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करुन पाच वर्षांखालील बालकांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिले. यावेळी आरोग्य विभागामार्फत राज्यभरात शहरी […]