कुटुंब प्रमुखाच्या (एचओएफ ) संमतीने आधारमध्ये ऑनलाइन पत्ता अद्ययावत करण्यासाठी, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युआयडीएआय ) रहिवासी स्नेही सुविधा सुरू केली आहे. ज्यांच्याकडे आधारमध्ये पत्ता अद्ययावत करण्यासाठी आपल्या रहिवासाच्या स्थानाची ओळख पटवणारी स्वतःच्या नावावरील कागदपत्रे नाहीत, रहिवाशांच्या अशा नातेवाईकांना-म्हणजेच मुले, जोडीदार, पालक इत्यादींना आधार मध्ये कुटुंब प्रमुखाच्या आधारे ऑनलाइन पत्ता अद्ययावत करण्यासाठीची सेवा खूप मदत […]
Month: November 2024
UGC-NET 2023 परीक्षेच्या तारखा जाहीर; अशा प्रकारे करा अर्ज
UGC NET 2023: UGC NET नोंदणी सुरू झाली आहे आणि नोंदणी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 17 जानेवारी 2023 असेल. उमेदवार येथे खाली दिलेल्या लिंक वरून नोंदणी करू शकतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) गुरुवारी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (UGC NET) नोंदणी प्रक्रिया सुरू केली. 21 फेब्रुवारी 2023 सुरू होणारी […]
नवोदय विद्यालय वर्ग 6 प्रवेश 2023 ऑनलाइन अर्ज
नवोदय वर्ग 6 प्रवेश 2023 ऑनलाइन अर्ज करा: NVS नवोदय विद्यालय प्रवेश 2023-24 अधिसूचना जारी @navodaya.gov.in. नवोदय विद्यालय प्रवेश 2023 इयत्ता 6 ची ऑनलाइन नोंदणी 02 जानेवारी 2022 पासून सुरू झाली आहे. 31 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2023 (JNVST 2023) इयत्ता 6 वी साठी 29 एप्रिल 2023 रोजी घेण्यात […]
मुंबईत बुधवारपासून ‘मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलन
मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, कला, उद्योग कल्पनांचे आदान-प्रदान होणार – मंत्री दीपक केसरकर यांची माहिती मुंबई, दि. १ : मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि कलेच्या दीर्घ परंपरेचा उत्सव साजरा व्हावा, मराठी संस्कृतीला उजाळा मिळावा, अभिजात मराठी साहित्याचे श्रवण व्हावे, पारंपरिक कला अभिव्यक्त व्हाव्यात, उद्योग कल्पनांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी भारतातील आणि भारताबाहेरील मराठी भाषिकांचे भव्य स्नेहसंमेलन […]
सुधीर नांदगावकर यांच्या निधनाने चित्रपटांवर नितांत प्रेम करणारा अभ्यासक गमावला : सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार
मुंबई, दि.१: ज्येष्ठ चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर यांच्या निधनाने चित्रपटांवर नितांत प्रेम करणारा अभ्यासक आपण गमावल्याची शोकभावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. मामी फिल्म फेस्टिव्हलची मूळ संकल्पनाच सुधीर नांदगावकर यांची. चित्रपट हा विशेष जिव्हाळ्याचा विषय.चित्रपट संस्कृतीच्या प्रचाराचा ध्यास घेतलेल्या श्री.नांदगावकरांनी अनेक चित्रपट महोत्सवांच्या आयोजनात सक्रिय योगदान दिले आहे. फिल्म सोसायटीच्या माध्यमातून […]
केशवराव धोंडगे यांच्या निधनाने एक सरळमार्गी व्यक्तिमत्व हरपले : मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. १ :केशवराव धोंडगे यांच्या निधनाने एक सरळमार्गी व्यक्तिमत्व आपल्यातून गेले आहे अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, केशवरावांच्या निधनाने एका पर्वाचा अस्त झाला आहे. आपल्या विचारसरणीशी ते शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले. मराठवाड्याच्या प्रश्नांवर ते आक्रमक राहिले. त्यांच्या निधनाने एक […]
केशवराव धोंडगे यांच्या निधनाने संघर्ष हेच जीवन मानणारा नेता हरपला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली मुंबई, दि. १ : केशवराव धोंडगे यांच्या निधनाने संघर्ष हेच जीवन मानणारा नेता हरपला, शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडावा, यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, अंधश्रद्धा आणि त्यामुळे येणारी […]
विकासकामे वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित विभागांनी प्रयत्नशील राहण्याची गरज – पालकमंत्री दीपक केसरकर
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ चा आढावा मुंबई, दि. २ : जिल्ह्यातील लोकहिताची विकासकामे दर्जेदार व्हावीत, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची तरतूद केली जाते. या योजना यशस्वीपणे विहित मुदतीत कार्यरत व्हाव्यात यासाठी संबंधित विभागांनी व यंत्रणा प्रमुखांनी दक्षता घ्यावी व मुंबई शहराच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असावे, असे आवाहन मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर […]
मराठी भाषेच्या वैश्विक स्तरावर प्रचार व प्रसारासाठी मुंबईत “मराठी तितुका मेळवावा” विश्व मराठी संमेलन
मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची माहिती मुंबई, दि. २ : मराठी भाषेचा सर्वांगीण प्रचार व प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी तसेच, सर्वांमध्ये मराठीतून संवाद करण्याची रुची निर्माण करण्यासाठी, दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करण्याकरिता “मराठी तितुका मेळवावा” या उदात्त हेतूने मराठी भाषा विभागामार्फत एक विश्व मराठी संमेलन मुंबईत आयोजित करण्यात आले […]
सैन्य दलाच्या जवानांप्रमाणे पोलिसांबद्दल जनमानसात आदराची भावना – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई ,दि.२ : राज्याचे पोलीस दल संपूर्ण देशात सर्वश्रेष्ठ मानले जाते. सैन्य दलांच्या जवानांप्रती लोकांमध्ये जशी आदराची भावना आहे, तशीच भावना राज्याच्या पोलीसांप्रती देखील आहे. करोना प्रकोपाच्या काळात डॉक्टर्स, नर्सेस यांच्या प्रमाणेच राज्यातील पोलीसांनी देखील जीवाची पर्वा न करता कार्य केले त्यामुळे राज्य पोलीस अभिनंदनास पात्र आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव मुंबई […]