येत्या जूनपासून नवीन शैक्षणिक धोरण सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे तांत्रिक शिक्षण देखील मराठीत दिले जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आज दिली. इंजिनियरिंग, मेडिकलचे शिक्षण मराठीत दिले जाणार असल्यामुळे याचा फायदा मराठी मिडियममध्ये शिकणाऱ्या मुलांना होणार आहे.
Day: November 23, 2024
माजी राज्यमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराजांनी मूलचेरा येथील बाबूराव आत्राम यांच्या कुटुंबाला केली आर्थिक मदत
दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत मूलचेरा:- तालुक्यातील स्थानिक मूलचेरा नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्र.11 येतील रहवासी असलेले बाबुराव आत्राम यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने खूप मोठी अडचण या परिवारावर आली होती.पण ही बाब राजे अम्ब्रिशराव महाराज माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना लक्षात येताच त्यांनी बाबुराव आत्राम […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट
नवी दिल्ली, ९: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनऊ येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री श्री. शिंदे दोन दिवसीय उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून आज रात्री त्यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर मुख्यमंत्री श्री. […]
पारस येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
मुंबई दि १०: अकोला जिल्ह्यातील पारस येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली आहे. तसेच सर्व जखमींवर शासकीय खर्चाने व्यवस्थित उपचार करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या दुर्घटनेत ७ भाविक ठार तर २३ […]
शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी, मदतीबाबत मंत्रिमंडळात लवकरच निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी; अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश नाशिक, दि. 10 (विमाका वृत्तसेवा) : बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे या गावामध्ये बिगरमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानाची माहिती […]
मार्चमधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी; शेतकऱ्यांना दिलासा!
मुंबई, दि. १०: राज्यात मार्च २०२३ मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीपिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन निर्णयदेखील काढण्यात आला. दि.४ […]
‘महाराष्ट्र भूषण’- २०२२ पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
इतिहासात नोंद घेतली जाईल असा सोहळा करुया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलिबाग, दि. १० (जिमाका) :- महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवार, दि. १६ एप्रिल २०२३ रोजी कॉर्पोरेट पार्क, खारघर, नवी मुंबई येथे आयोजित सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे. यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची वाढणार आहे. म्हणूनच आपण […]
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १७७ कोटींची मदत जाहीर, राज्य सरकारचा निर्णय
महाराष्ट्र सरकारने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १७७ कोटी रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. मार्च महिन्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. ऐन उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. राज्यात विविध जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून शेतकऱ्यांचं […]