Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मेट्रो-३ च्या आरे ते बीकेसी स्थानकादरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रस्तावित चर्चगेट ते विधानभवन या मेट्रो-३ भुयारी मार्गाच्या स्थानकाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी मेट्रो ही खऱ्या अर्थाने मुंबईची जीवनरेषा मुंबई, दि. १० :  मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून मुंबईकरांची ती गरज पूर्ण होणार आहे. सध्या मेट्रो-३ हा मार्ग जवळपास ९० टक्के पूर्ण झाला असून येत्या डिसेंबर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नांना म्हाडाचे बळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोकण मंडळ म्हाडाच्या घरांच्या संगणकीय सोडतीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई, दि. १०- सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नांना बळ आणि आकार देण्याची जबाबदारी म्हाडा चांगल्या रितीने पेलत आहे. अनेक कुटुंबांचे गृहस्वप्न पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मला मिळाली याचा आनंद आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. म्हाडाच्या कोकण मंडळाची ४ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अमली पदार्थ विरोधी ‘मिशन थर्टी डेज’ मोहीम राबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

‘ड्रग्ज्स फ्री मुंबई’साठी धडक मोहीम मुंबई, दि. १० : मुंबई अमली पदार्थ मुक्त करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसात सुमारे ७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून गेल्या आठवडाभरात मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणांहून ३५० पेक्षा अधिक जणांना अटक केली आहे. या मोहिमेला अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘मिशन थर्टी डेज’ मोहीम […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘अल निनो’चा विचार करून धान रोवणी व पेरणीच्या कालावधीचे सूक्ष्म नियोजन करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भंडारा जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्वतयारीचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा धान खरेदीबाबत पुढील आठवडयात भंडाऱ्यात बैठक भंडारा, दि. 10 : ‘अल निनो’च्या प्रभावामुळे यावर्षी मान्सुनच्या आगमनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात धानपिक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. मात्र यावर्षी अल निनोचा  विचार करून धान रोवणी व  पेरणीच्या कालावधीचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनरेगा पुस्तिका, ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन

लातूर, दि. 10 (जिमाका) : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिका, घडीपत्रिका आणि मनरेगा योजनेच्या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विमानतळावरील कक्षात करण्यात आले. लातूरचे पालकमंत्री गिरीष महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्यासह जिल्हाधिकारी […]