गडचिरोली दि.२४ : जिल्हा निवडणूक अधिकारी, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग आणि फुले-आंबेडकर कालेज ऑफ सोशल वर्कच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृतीसाठी गडचिरोली शहरात मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली शहरात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आज सकाळी मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची […]
Day: April 18, 2025
नमो महारोजगार मेळाव्यातून 2 लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वयंरोजगार देण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लातूर, दि. 23 : नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील 2 लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, हे आपले उद्दिष्ट आहे. लातूर येथे आयोजित विभागीय नमो महारोजगार मेळाव्याप्रमाणेच राज्यातील इतर विभागातही अशा मेळाव्यांचे आयोजन होणार असल्याने सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी एक टीम म्हणून हे मेळावे यशस्वी करण्याचे प्रयत्न करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. […]
शालेय अभ्यासक्रमातील कृषी संबंधित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 23 – कृषी घटकाचे महत्त्व लक्षात घेता शालेय अभ्यासक्रमामध्ये कार्यानुभव विषयांतर्गत कृषी घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. या विषयातील उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी व शाळांना दिले आहेत. भारत हा कृषीप्रधान देश असून शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात कृषी […]