गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

गडचिरोलीत सावित्रीच्या लेकींसाठी येणार नव्या ५५ बसेस शासनाची मान्यता, मानव विकास कार्यक्रम अंतर्गत बससेवा

ग्रामीण भागातील सर्वच मुलींना शिक्षण घेता यावे याकरीता गाव ते शाळा दरम्यान मानव विकास कार्यक्रम अंतर्गत शासनाकडून बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजने अंतर्गत जिल्हयाकरीता उपलब्ध बसेस, प्रत्यक्ष सुरू असलेल्या बसेसची संख्या आणि बसेसचे आर्युमान लक्षात घेऊन शासनाने गडचिरोली जिल्हयासाठी 55 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हयाच्या ग्रामीण भागातील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान

विद्यार्थीदशेत शिक्षणासोबत स्वच्छतेची गोडी लागल्यास स्वच्छता ही विद्यार्थ्याच्या आयुष्याचा भाग बनून जाते. शाळा स्वच्छतेच्या कार्यात त्यांना सकारात्मकपणे सहभागी करुन शिक्षण आनंददायी, प्रेरणादायी वातावरण निर्मिती होण्यासह वैयक्तिक स्वच्छतेची सवय जडते. राज्य शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थीदशेतच स्वच्छतेचे संस्कार होण्यास मदत होणार आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यातील गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘किलकारी’ योजनेचा शुभारंभ

आशा सेविकांसाठी मोबाईल अकादमी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्यावतीने गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘किलकारी’ या नव्या योजनेचा व आशा सेविकांसाठी मोबाईल अकादमीचा आजपासून राज्यात शुभारंभ झाला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, केंद्रीय मंत्री डॉ. एस. पी. सिंग बघेल, गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नवी दिल्ली येथून डॉ. भारती पवार यांनी महाराष्ट्र व […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू, ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये मिळणार

राज्य सरकारने 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी “मुख्यमंत्री वयोश्री योजना” (Mukhyamantri Vayoshri Yojana) सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, या योजनेचा शासन निर्णय दिनांक 06 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11.24 कोटी इतकी आहे. त्यापैकी सद्यस्थितीत 65 वर्षे व त्यावरील अंदाजित एकूण 10-12 टक्के ज्येष्ठ नागरिक (1.25 – 1.50 कोटी) आहेत. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मतदान यंत्राबाबत जनजागृती मोहीम

मुलचेरा-: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तसेच तालुक्याचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी चेतन पाठील यांच्या मार्गदर्शनाखाली समोर होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान यंत्राची माहिती तसेच प्रत्यक्ष प्रात्याक्षिक तालुक्यातील 42 मतदान केंद्रावर मतदारांना करून यावेळी इवीएम यंत्र तसेच विवीपॅट मतदान यंत्राविषयी विस्तृत माहिती तालुक्याचे मास्टर ट्रेनर रितेश चिंदमवार यांनी मतदारांना करून दिली. यावेळी निवडणूक ऑपरेटर संघपाल पेळूकर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कट्टरतेच्या सर्व भिंती तोडून एकसंध भारत बनवणे आपले कर्तव्य

– सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन संपूर्ण विश्वाला भारताची गरज आहे. आपले ज्ञान आणि विज्ञान ही आपली परंपरा आहे. हे ज्ञान विश्वाला द्यायचे आहे. त्यामुळे कट्टरतेच्या सर्व भिंती तोडून एकसंध, एकरस, सुखी सुंदर भारत बनवणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक Dr. Mohanji Bhagwat डॉ. मोहनजी भागवत यांनी सोमवारी येथे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

महाकुंभासाठी 100 कोटींची तरतूद

– उत्तरप्रदेशचा अर्थसंकल्प सादर – रामायण, वैदिक संशोधन केंद्रासाठीही निधी उत्तरप्रदेश सरकारने सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात 2025 मध्ये होणार्‍या Uttar Pradesh- Mahakumbh महाकुंभासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या व्यतिरिक्त अयोध्येतील आंतरराष्ट्रीय रामायण आणि वैदिक संशोधन केंद्रालाही निधी देण्यात आला आहे. 2025 मध्ये होणार्‍या महाकुंभासाठी 100 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत, असे अर्थमंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

यंत्रमाग धारकांच्या समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी गठित समितीच्या अहवालाचे प्रारूप वस्त्रोद्योग मंत्र्यांना सादर

यंत्रमाग धारकांना (२७  HP) ते (२०१ HP)  या प्रवर्गातील घटकांना प्रति युनिट ७५ पैसे अतिरिक्त वीज सवलत देण्याबाबत शासनाने प्रस्तावित केले आहे. याच धर्तीवर  साध्या यंत्रमाग धारकांना (२७ HP ) खालील प्रति युनिट ७५  पैसे  वीज सवलत मिळण्याबाबची शिफारस गठित समितीने केली आहे. याबाबतचा  प्रस्ताव  तातडीने तयार करावा, असे निर्देश वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अनाथ मुलांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविणार – मंत्री आदिती तटकरे

अनाथ मुलांचे संगोपन आणि उच्च शिक्षणासाठी राज्य शासन संवेदनशील आहे. राज्यातील अनुरक्षण गृहातील अनाथ गृहातील बालकांना शासकीय योजनांचे विविध लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल. त्यानुसार उपाययोजना करण्यात येतील, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. विधानसभेत अनाथ बालकांबाबत दिलेल्या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मंत्री कु. तटकरे यांच्या दालनात आज दुपारी बैठकीचे आयोजन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अतिदुर्गम गेदा येथे होणार समाज मंदिराचे बांधकाम राष्ट्रवादीच्या नेत्या भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भुमुपूजन संपन्न

एटापल्ली:तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल गेदा येथे सुसज्ज समाज मंदिर बांधकाम केले जाणार असून 3 फेब्रुवारी रोजी माजी जि प अध्यक्ष तथा राष्ट्रवादीच्या नेत्या भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. गेदा येथील नागरिकांनी भाग्यश्री ताई आत्राम यांच्याकडे गावात समाज मंदिर बांधकाम करण्याची मागणी केली होती.गावातील नागरिकांची मागणी लक्षात घेता ताईंनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे […]