Month: December 2024
१११ वर्षाच्या आजीचे उत्साहात मतदान तरुण मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे केले आवाहन
गडचिरोली दि .२०: गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मतदार मोठ्या संख्येत उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत.सकाळी ७ वाजेपासूनच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. लोकशाहीच्या या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत येथील १११ वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले. फुलमती बिनोद सरकार (वय १११) असे त्या आजींचे नाव असून त्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील […]
गौतम गंभीरला दिल्ली हायकोर्टाचा मोठा दिलासा; ‘या’ प्रकरणात दिले महत्वाचे निर्देश
नवी दिल्ली: दिल्लीतील फ्लॅट खरेदी प्रकरणात भारतीय क्रिकेट संघाचा कोच आणि माजी खासदार गौतम गंभीर यांना दिल्ली हयकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात सुनावणी करत असताना दिल्लीतील सत्र न्यायालयाने गौतम गंभीर याच्याविरुद्ध फसवणुकीचा खटला पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दिला होता. दरम्यान या निर्णयाला दिल्ली हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे गौतम गंभीरला मोठा दिलासा मिळाला आहे. […]
पश्चिम महाराष्ट्रात कोण मारणार बाजी; कोणाची ताकद जास्त, कोण कमजोर?
पुणे: पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या चार कृषी जिल्ह्य़ांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप आणि शिवसेना यांच्यात चुरशीची लढत होत असते. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये या जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या ३७ विधानसभा जागांवर अविभाजित राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. त्याचवेळी भाजप, काँग्रेस आणि अविभाजित शिवसेनेलाही जवळपास समसमान जागा मिळाल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही […]
मतमोजणी पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी यांचेकडून आढावा
गडचिरोली दि.१८: जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी रविवार, १७ नोव्हेंबर रोजी येथील चंद्रपूर मार्गावरील क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत असलेल्या सुरक्षा कक्ष व मतमोजणी कक्षाची पाहणी करून मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतला व महत्त्वाच्या सूचना दिल्या. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी बुधवार, २० नोव्हेंबर रोजी मतदान […]
मतदानाच्या 48 तास आधी प्रचारास बंदी
गडचिरोली,दि.17 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. मतदारसंघात 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत. यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी या तीन विधानसभा मतदार […]
मतदान व मतमोजणीसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी
गडचिरोली,(जिमाका),दि.17: जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान व 23 नोव्हेंबर मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी, निवडणूक कालावधीत सार्वजनिक अथवा खाजगी मालमत्तेस क्षती पोहचण्यास अथवा मानवी जिविताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला संकट उत्पन्न होण्यास अथवा शांतता बिघडवण्यास अथवा दंग्यास किंवा दंगलीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी संजय दैने यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम […]
निवडणूक कामात हयगय करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
निवडणूक कामात हयगय करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल कर्तव्यत कसूर केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही- जिल्हाधिकारी गडचिरोली दि.17 : निवडणूक कामात हयगय केल्याप्रकरणी पोर्ला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी यांच्यावर गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये काल रात्री भारतीय न्याय संहिता2023 च्या कलम 223 अन्वये व लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या कलम 134(1) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (एफआयआर क्रं.891) […]
मतमोजणी पथकाचे प्रशिक्षण संपन्न
गडचिरोली (देसाईगंज):- भारत निवडणूक आयोगाद्वारा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे. त्यानुसार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया तर दिनांक 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, आरमोरी रोड देसाईगंज येथे मतदान मोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या अनुषंगाने 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा क्षेत्रातील मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याकरीता […]
गडचिरोली पोलीसांनी उधळुन लावला माओवाद्यांचा घातपात करण्याचा डाव आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर स्फोट घडवुन आणण्यासाठी पेरलेले स्फोटके गडचिरोली पोलीस दलाने केले नष्ट
गडचिरोली जिल्हा हा माओवादाने प्रभावीत जिल्हा असल्याने या ठिकाणी माओवादी हे विविध हिंसक कारवाया करुन सुरक्षा दलाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करीत असतात. आगामी होणाया विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर माओवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानंाना नुकसान पोहचविण्याचा उद्देशाने भामरागड आणि ताडगावला जोडणाया पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटके (IED) पेरून ठेवली आहेत अशी विश्वसनिय गोपनिय माहिती मिळाली होती. त्यावरून आज […]