महाराष्ट्र

एकल पाल्यांच्या शिक्षणाला मिळणार समुपदेशनाचा आधार; राज्यातील १,२३८ महाविद्यालयांत समुपदेशक नियुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

मुंबई, दि. २६: एकल मातांच्या पाल्यांचे उच्च शिक्षण कोणत्याही परिस्थितीत अडथळ्याविना सुरू राहावे, तसेच त्यांना येणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि भावनिक अडचणींवर मात करण्यासाठी योग्य मार्गदर्शन व आधार मिळावा, या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत ‘एकल पाल्य समुपदेशन’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) […]

क्रीडा

५३ धावांवर अडचणीत सापडलेल्या उत्तर प्रदेशला समीर रिझवीचा तडाखा! षटकार-चौकारांचा पाऊस पाडत ठोकले झंझावाती शतक

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत समीर रिझवीची धडाकेबाज खेळी; मिझोरामविरुद्ध उत्तर प्रदेशला मिळवून दिला शानदार विजय मुंबई : सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीमध्ये गुरुवारी (२६ नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उत्तर प्रदेश आणि मिझोराम यांच्यात रंगतदार सामना झाला. या सामन्यात उत्तर प्रदेशचा युवा फलंदाज समीर रिझवी याने आपल्या आक्रमक फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या ५ […]

महाराष्ट्र

बिसलेरीच्या पाण्याबाबत मोठे स्पष्टीकरण! केवळ ‘गो २७०’च्या एका बॅचच्या विक्रीवर निर्बंध; देशभरातील अन्य उत्पादनांना बंदी नाही

बिसलेरीच्या पाण्याबाबत मोठे स्पष्टीकरण! केवळ ‘गो २७०’च्या एका बॅचच्या विक्रीवर निर्बंध; देशभरातील अन्य उत्पादनांना बंदी नाही FSSAI च्या स्पष्टीकरणाचे बिसलेरीकडून स्वागत; १४ महिन्यांपूर्वी तयार केलेल्या विशिष्ट बॅचपुरतीच कारवाई मर्यादित मुंबई, दि. २६ नोव्हेंबर : बिसलेरी कंपनीच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता महत्त्वाचे स्पष्टीकरण मिळाले आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) दिलेल्या स्पष्टीकरणाचे […]

इतर महाराष्ट्र

तांडा वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात आढावा बैठक

मुंबई, दि. २६: तांडा वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामविकास विभागाने स्वतंत्र तांडा वस्ती विकास प्राधिकरण स्थापन करावे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून शाळा, अंगणवाडी, रस्ते, पोहोचमार्ग, पाणीपुरवठा, पाण्याची टाकी, स्मशानभूमी यांसारख्या मूलभूत सुविधांची कामे तीन वर्षांत पूर्ण करण्याचा कालबद्ध आराखडा तयार करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत […]

महाराष्ट्र विदर्भ

अधिकृत सदनिकांना स्वतंत्र हक्क अभिलेख देणारी ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ प्रणाली लागू करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मसुदा ३० दिवस सूचना-हरकतींसाठी खुला; अभिप्रायानंतर दोन महिन्यांत अंतिम नियमावली

मुंबई, दि. २६ : राज्यातील मंजूर आणि अधिकृत इमारतींमधील प्रत्येक सदनिकेला स्वतंत्र ओळख व पूरक अधिकार अभिलेख देण्यासाठी राज्य शासन ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ प्रणाली लागू करणार आहे. महसूल विभागाने यासंबंधीची प्रारूप अधिसूचना २६ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध केली असून नियमावलीचा मसुदा ३० दिवस नागरिकांच्या सूचना व हरकतींसाठी खुला राहील. प्राप्त अभिप्रायाचा विचार करून […]

क्रीडा महाराष्ट्र

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. २६ : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन क्रीडा विभागाने अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे इच्छुक खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांतील खेळाडू व व्यक्तींना २६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत अर्ज सादर करता येणार असल्याची माहिती मुंबई जिल्हा […]

महाराष्ट्र विदर्भ

दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत बैठक

मुंबई, दि.२६ : दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन संवेदनशील आहे. मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. या मागण्यांबाबत यापूर्वी उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून या अहवालातील शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. सह्याद्री अतिथिगृह येथे दुय्यम न्यायालयातील कर्मचारी संघटनांच्या […]

इतर ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र

सिंचन योजनांच्या कामांना गती द्या; मंजुरीचे प्रस्ताव तातडीने पाठवा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. २६:- जलसंपदा प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करून सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी ज्या योजनांच्या कामांना शासन स्तरावरून मंजुरीची आवश्यकता आहे अशा योजनांच्या कामाचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अशा सूचना जलसंपदा ( कृष्णा व गोदावरी खोरे विकास महामंडळ) मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांनी दिल्या. जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी आज मंत्रालयात मांजरा धरणाचे पाण्याचे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

‘हा घाबरणारा भारत नाही, तर दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देणारा भारत आहे’ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एनएसजीच्या ‘#NEVEREVER’ सोहळ्यात 26/11 च्या हुतात्म्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

मुंबई, दि. २६: मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याने देशाच्या मनावर उमटलेली जखम आजही कायम आहे. मात्र, हुतात्म्यांच्या अतुलनीय शौर्याने आणि मुंबई पोलिसांसह एनएसजी कमांडोंच्या धाडसी कारवाईने दहशतवाद्यांना भारताची ताकद दाखवून दिली. हा डरनेवाला भारत नाही, तर दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देणारा आणि गरज पडल्यास घरात घुसून मारणारा नवा भारत आहे, असा ठाम संदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]