श्री रामलला प्राणप्रतिष्ठापनानिमित्त अहेरी,आलापल्ली येथे भव्य दुचाकी रॅली
अहेरी:- अयोध्या येथील श्री रामलला प्राणप्रतिष्ठापना निमित्य अहेरी व अल्लापल्ली शहरात २२ जानेवारी रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात आले. या शोभायात्रेत चक्क स्कुटीवर स्वार होत माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम रॅलीत सहभाग झाले.
आयोध्या येथे २२ जानेवारी रोजी श्री रामलला प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात भव्यदिव्य उपक्रमांनी साजरा करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते व हजारो प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तीन ते चार दिवसापासूनच देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी व आलापल्ली या दोन शहरात तीन दिवसापासून विविध उपक्रम घेत २२ जानेवारी रोजी भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्याश्री ताई आत्राम ह्या चक्क स्कुटीवर स्वार होत रॅलीत सहभाग घेतला.
यावेळी राम भक्तांनी मोठ्या जल्लोषात शोभायात्रा काढत राम मंदीर परिसरात मोठ्या एलईडी स्क्रीन वर कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. यावेळी विविध गावातील मोठ्या संख्येने रामभक्त सहभाग झाले होते.