ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

पेसा क्षेत्रातील तलाठी पदभरतीची गुणवत्ता यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध

उमेदवारांनी दस्तावेज पडताळणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन
गडचिरोली दि. 6 : पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात 5 ऑक्टोंबर 2024 रोजीच्या शासन निर्देशानुसार परवानगी प्राप्त झाली आहे. त्याअनुषंगाने, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे आस्थापनेवरील तलाठी पदभरतीकरीता गुणवत्तेनुसार दस्ताऐवज पडताळणी तातडीने करण्यात येत असून गुणवत्ता यादी व दस्ताऐवज पडताळणीचे वेळापत्रक जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे
संकेतस्थळ https://gadchiroli.nic.in येथे प्रसिध्द करण्यात येणार आहे.  उमेदवारांनी गुणवत्ता यादी व वेळापत्रकाची  संकेतस्थळावर भेट देऊन पाहणी करावी व त्यानुसार आवश्यक दस्ताऐवजासह पडताळणीस हजर राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी केले आहे.