ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विधानसभा निवडणुकीतील 40 लाखांची

निवडणुकीच्या कालावधीत 50 हजार रुपयांवर रोख रक्कम बाळगण्यावर निर्बंध असताना अनेकांकडे त्यापेक्षा जास्त रक्कम आढळली होती. तपासणीत जिल्ह्यात 22 प्रकरणात 50 हजारापेक्षा जास्त रक्कम आढळून आली होती. कागदपत्रांची पूर्तता केल्याने त्यातील 21 प्रकरणांतील रोख रक्कम परत करण्यात आली तर एका प्रकरणात सुनावणी व्हायची आहे.

आचारसंहितेच्या कालावधीत 50 हजारांच्या वर रोख रक्कम बाळगण्यास बंदी होती. प्रशासनाच्या वतीने निवडणुकीच्या अनुषंगाने तपासणी नाके तयार करण्यात आले. तसेच विविध पथकांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत होती. त्यामध्ये वाहनांची तपासणी करताना काही ठिकाणी रोख रक्कमही आढळून आली. वर्धा जिल्ह्यात 50 हजार रुपयांवर रोख रक्कम असलेली 22 प्रकरणे नोंद झाली. यात तब्बल 41 लाख 7 हजार 540 रुपयांची रोख हस्तगत करण्यात आली होती.
जप्त केलेली रोख प्रशासनाकडून सुनावणी घेत तसेच कागदपत्रांची  खातरजमा केल्यानंतर संबंधितांना परत करण्यात आली. त्यात 21 प्रकरणांची सुनावणी होऊन कागदपत्रांची खातरजमा झाल्यानंतर 39 लाख 97 हजार 540 रुपयांची रोख रक्कम संबंधितांना परत करण्यात आल्याची माहिती आहे. एका प्रकरणाची सुनावणी व्हायची आहे. सुनावणी व्हायची असल्याने 1 लाख 10 हजार रुपयांची रोख प्रकरण प्रलंबीत असल्याची माहिती आहे.
काही मर्यादेच्या वर रोख आढळल्यानंतर ती प्रकरणे आयकर विभागाकडे देण्यात आली. त्यामध्ये एका प्रकरणात 12 लाख 14 हजार 200 रुपयांच्या रकमेसंदर्भात आयकर विभागाकडून नाहरकत दिल्या गेल्याची माहिती आहे. तसेच एका प्रकरणात 18 लाखांची रक्कम आयकर विभागाकडे जमा करण्यात आली होती.