“संकल्प ते सिद्धी” कार्यक्रम मुलचेरा मंडल येथे मोठया उत्सहात साजरा.
_“एक पेड़ माँ के नाम” उपक्रमांतर्गत मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते वृक्षारोपण.!
मुलचेरा:- भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त संपूर्ण देशभर “संकल्प ते सिद्धी” जनजागृती अभियान साजरा होत आहे.याचाच एक भाग म्हणून मुलचेरा तालुक्यात भाजपा मंडळातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम डॉ.हेडगेवार जनशताब्दी सेवा समितीच्या वस्तीगृहात मोठ्या उत्साहात पार पडला.या प्रसंगी “एक पेड़ माँ के नाम”या अभिनव उपक्रमांतर्गत माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.
मा.खा.डॉ.अशोकजी नेते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले – “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सुशासन, सेवा व गरीब कल्याणाच्या त्रिसूत्रीवर यशाची शिखरं गाठली आहेत.गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारने जे केले,ते काँग्रेस ६० वर्षांत करू शकली नाही. आज देशाची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे,ही यशाची खरी कहाणी आहे.” ते पुढे म्हणाले – “मी स्वतः १० वर्षे संसदेमध्ये पंतप्रधान मोदींसोबत कार्य करण्याचं भाग्य लाभलं.या काळात मी अनेक विकासकामे मार्गी लावली – रेल्वे प्रकल्प,सुरजागड लोह प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय,कृषी विद्यापीठ,एकलव्य विद्यालये,बॅरेजेस, राष्ट्रीय महामार्ग यांसारख्या कामांचा यामध्ये समावेश होतो.” असे प्रतिपादन संकल्प ते सिद्धी या कार्यक्रमाप्रसंगी मा.खा.डॉ.अशोकजी नेते यांनी केले.
या कार्यक्रमात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संकल्प करण्यात आला. “एक पेड़ माँ के नाम” या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण प्रस्तुत करण्यात आले.
या कार्यक्रमात मुलचेरा भाजपा कार्यालयासाठी मान्यवरांनी दिलेल्या भेटवस्तूंनी सर्वांची मने जिंकली.
मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांचे कडून – ५० बसण्याच्या खुर्च्या, रविंद्र ओल्लालवार व प्रशांत कुतरमारे –यांचे कडून व्यवस्थित बैठकी खुर्च्या,बादल शहा –यांचे कडून साउंड सिस्टिम,या सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. याचबरोबर सेवानिवृत्त शिपाई श्री.चंद्रय्या मल्लमपल्ली आणि नवीन बूथ प्रमुखांचा सन्मानही करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमात प्रामुख्याने ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुतरमारे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता,जिल्हा सचिव बादल शहा,तालुकाध्यक्ष संजय सरकार,तालुका उपाध्यक्ष गणेश गारघाटे,नगरसेवक दिलीप आत्राम,ज्येष्ठ नेते सुभाष गणपती, विद्यान वैद्य,निखिल हलदार,अशोक बढाल याशिवाय महिला व युवा मोर्चा पदाधिकारी,मंडळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.!