Uncategorized

वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या कर्ज योजनेची मर्यादा आता रुपये १ लाख रुपये || VJNT loan scheme 2022

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या कर्ज योजनेची मर्यादा आता रुपये १ लाख रुपये

शासन निर्णय निर्गमित 14 Feb 2022
 
Vasantrao Naik Vimukt Jati & Bhatkya Jamati Vikas Mahamandal Limited LOAN Scheme 2021
Vasantrao Naik Vimukt Jati & Bhatkya Jamati Vikas Mahamandal Limited LOAN Scheme 2021
Vasantrao Naik Vimukt Jati & Bhatkya Jamati Vikas Mahamandal Limited LOAN Scheme 2021
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या थेट कर्ज योजनेमध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील घटकांची आर्थिक उन्नती करणे,
 स्वयंरोजगारास प्रोत्साहित करणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम  करून तात्काळ वित्त पुरवठा करणे हा योजनेचा उद्देश आहे.
या योजनांसाठी लघु व्यवसाय उदा. मत्स्य व्यवसाय, कृषी क्लिनिक, पॉवर टिलर,हार्डवेअर व पेंट शॉप, सायबर कॅफे, संगणक प्रशिक्षण, झेरॉक्स, स्टेशनरी, सलुन, ब्युटी पार्लर मसाला उद्योग, पापड उद्योग, मसाला मिर्ची कांडप उद्योग, वडापाव विक्री केंद्र, भाजी विक्री केंद्र, ऑटोरिक्षा, चहा विक्री केंद्र, सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र, डी. टी. पी. वर्क, स्विट मार्ट, ड्राय क्लिनिंग सेंटर, हॉटेल, टायपिंग इन्स्टीट्युट, ऑटो रिपेअरींग वर्कशॉप, मोबाईल रिपेअरिंग, गॅरेज, फ्रिज दुरुस्ती, ए. सी. दुरुस्ती, चिकन/मटन शॉप, इलेक्ट्रिकल शॉप, आईस्क्रिम पार्लर व इतर,मासळी विक्री, भाजीपाला विक्री, फळ विक्री, किराणा दुकान, आठवडी बाजारामध्ये छोटसे दुकान, टेलिफोन बुथ किंवा अन्य तांत्रिक लघु उद्योग अशा लघु व्यवसायासाठी ही योजना सुरू करणे. या योजनेसाठी विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील निराधार, विधवा महिला या लाभार्थीना तात्काळ  व  प्राथम्याने लाभ देण्यात येणार आहे.
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्याच्या प्रस्तावित थेट कर्ज योजनेचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. प्रकल्प खर्चाची मर्यादा १ लाख रूपये पर्यंत असेल. या योजनेत महामंडळाचा सहभाग १००% असून  कर्जमंजूरीनंतर १ लाख रूपयांचे कर्ज लाभार्थ्याला देण्यात येईल. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्‍या लाभार्थ्यींना व्याज आकारण्यात येणार नाही.
कर्जपरतफेडीचा कालावधी व कर्जाची परतफेड नियमित न करणाऱ्‍या लाभार्थ्यांच्याबाबतीत दंडनीय व्याजदर असेल. नियमित ४८ समान मासिक हप्त्यामध्ये मुद्दल रू.२,०८५/- परतफेड करावी लागेल. नियमित कर्जाची परतफेड न करणाऱ्‍या लाभार्थीना जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होतील त्या रक्कमेवर द.सा.द.शे. ४% व्याज आकारण्यात येईल. कर्जमंजूरीनंतर कर्जदाराला पहिला हप्ता ७५%  असेल  ७५ हजार रूपये वितरीत करण्यात येईल. तसेच  दुसरा हप्ता  २५%  असेल त्याचे वितरण प्रत्यक्ष उद्योग सुरू झाल्यानंतर साधारणतः ३ महिन्यानंतर जिल्हा व्यवस्थापकांच्या तपासणी अभिप्रायानुसार २५ हजार  रूपये  इतके वितरीत करण्यात येईल.

लाभर्थीच्या पात्रतेच्या अटी : 

  • महाराष्ट्राचा रहिवाशी असावा
  • वय वर्ष १८ ते ५० वर्ष असावे
  • लाभार्थीचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे
  • वेबपोर्टल / महामंडळ संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे
  • उमेद्वाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी व यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा
  • उमेदवार कोणत्याही बॅंकेचा / वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा
  • उमेद्वाराने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे प्रकरण हातालन्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे
  • कुटुंबातील एक व्यक्तीला केवळ एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल

ऑनलाइन कर्ज योजनेचा फॉर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्र : 

  1. आधार कार्ड
  2. पैन कार्ड
  3. बैंक पासबुक
  4. जातीचे प्रमाणपत्र
  5. राशन कार्ड
  6. प्रोजेक्ट रिपोर्ट
  7. एक पासपोर्ट साइज फोटो

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 119 वी  बैठक  बहुजन कल्याण मंत्री श्री. वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात पार पडली. संचालक दिलीप हळदे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आनंद माळी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत संचालक मंडळाच्या 118 व्या सभेच्या इतिवृत्तास व केलेल्या कार्यवाहीस  मान्यता देण्यात आली. महामंडळाच्या नियमित आस्थापनेवरील रिक्त असलेली  पदे भरण्यास मंजुरी, नियमित आस्थापनेवरील अधिकारी  कर्मचारी यांना पदोन्नती आदी विषय मंजुरीसाठी बैठकीत मांडण्यात आले.
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची यापूर्वीची रुपये 25 हजार रु. थेट कर्ज योजनेची मर्यादा रुपये १ लाख पर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली असून वसंतराव  नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातील रिक्त पदे भरण्यास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. रिक्त पदासंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश यावेळी श्री.वडेट्टीवार यांनी दिले.
बैठकीत महामंडळाच्या नियमित आस्थापनेवर  एकूण 96  पदे मंजूर असून  रिक्त पदे भरण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली. महामंडळाच्या बीज भांडवल कर्ज योजना व राष्ट्रीय मागासवर्ग वित्त विकास महामंडळ, नवी दिल्ली या दोन्ही योजनांची वसुली वाढविण्याकरिता थकित कर्जावरील व्याजाच्या रकमेत ५० टक्के सवलत लागू करणे आणि महामंडळाची यापूर्वीची रुपये 25 हजार थेट योजनेची मर्यादा रुपये 1 लाख पर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 

Farmer Producer Company – FPC

सन १९५६ च्या कंपनी कायद्यात बदल करुन त्यातील कलम ९-अ मधे शेती उत्पादक कंपनी बाबतीत कायदा, नियमावली देण्यात आलेली आहे. कंपनी कायदा २०१३ मधिल सेक्शन ४६५ (१) मधे सध्या ते आपणास बघावयास मिळेल.

या FPC कंपनी मुळे शेतक-यांना काय फायदे होतील ते आपण या सदरात जाणुन घेणार आहोत. ह्या कंपनी कायद्याच्या अंतर्गत शेतकरी काय काय लाभ मिळवु शकतो ते देखिल आपण बघणार आहोत, तसेच त्यांस अनुसरुन इतर काही योजना कशा लाभकारक ठरतील ते देखिल बघणार आहोत.

शेतकरी उत्पादक कंपनी ( Farmer Producer Companyउद्देश :-
  • उत्पादन ,कापणी ,खरेदी,प्रतवारी,संकलन,हाताळणी,प्रक्रिया,बाजारपेठ,विक्री, सदस्यांच्या  प्राथमिक उत्पादंनांची निर्यात किंवा त्यांच्या लाभाकरीता उत्तम प्रतीच्या सेवांची आयात करणे .
  • प्रक्रिया अंतर्गत साठवणूक,माल सुकविणे,प्रतवारी,ग्रेडेशन,जाहिरात आणी सदस्यांच्या मालाचे पॅकिंग  करणे .

फळे, भाजीपाला,मशरुम, प्लांटेशन पिके, आणि इतर फळ पिके

दुध आणि दुग्ध जन्य पदार्थ

कोंबडी आणि इतर मांस

मासे व इतर समुद्री प्राणी

कडधान्य, तृणधान्य, तेलबीया

औषधी वनस्पती, जंगलापासुन निर्मित वनौऔषधी

कंज्युमर फुड प्रोडक्ट जसे बेकरी, कफ्नेश्कनरी इ.

इतर रेडी टु ईट उत्पादने

कार्बोनेटेड ड्रिंक्स, नॉन अल्कोहोलिक बिव्हेरेजेस, एनर्जी ड्रिंक, पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर, सॉफ्ट ड्रिंक इ.

फुट फ्लेवर्स, फुड कलर्स, मसाले, इ.

हेल्थ फुड, हेल्थ ड्रिंक्स इ.

आणि इतर सर्व प्रकल्प जे केंद्र शासन फळ प्रक्रिया म्हणुन मान्यता देते.

 

शेतकरी उत्पादक कंपनीचे ( Farmer Producer Company) व्यवस्थापन :-

 

  • उत्पादक कंपनी स्थापन करण्याकरिता कमीत कमी ५ व जास्तीत जास्त १५ संचालकांची नोंदणी करता येते.
  • किमान ५ संचालक आणी ५ प्रवर्तक एकत्र येऊन १० व्यक्ति कंपनीची नोंदणी करू शकतात, प्रवर्तक व संचालक एकच असु शकतो.
  • संचालक मंडळाने कामकाजा करिता पूर्ण वेळ आपल्या पेक्षा वेगळा व्यवस्थापक नियुक्त करावा .
  • व्यवस्थापनाचे अधिकार संचालक व्यवस्थापकांना प्रदान करू शकतात .

 

शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी करिता आवश्यक कागद पत्रे :-

 

  • संचालकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • पॅन कार्ड
  • निवासी पुरावा – विज बिल ,टेलिफोन बिल,बँक स्टेटमेंट,पासपोर्ट,शाळा सोडल्याचा  दाखला ,मतदान नोंदणी कार्ड,ग्रामपंचायत दाखला यापैकी किमान दोन पुरावे आवश्यक आहेत.
  • ७/१२ चा उतारा

 

शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी प्रक्रिया :-
 
  • डिजिटेल सिग्नेचर  सर्टिफिकेट :-  कमीत कमी एका संचालकचे किंवा अध्यक्षाचे डिजिटेल सिग्नेचर  सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. कागदपत्रे स्वाक्षरीत करण्या करिता कंपनीने आपला एक प्रतींनिधी अधिकृत  करणे आवश्यक आहे. हे प्रमाण पत्र मिळविण्या करिता आपणाला कापारेट अफेअर्स मंत्रालयाच्या वेब साईट वर उपलब्ध असून प्रणालीकरण  यंत्रणे कडे तो ऑनलाइन भरावा लागतो.
  • डायरेक्ट आयडेंन्टीफिकेशन नंबर (DIN):- सदर क्रमांक हा कंपनी अफेअर कक्ष Noida उत्तर प्रदेश येथून ऑनलाइन मिळतो ,त्या करिता पॅनकार्ड ,डायव्हीग परवाना,मतदान ओळख पत्र किंवा पासपोर्ट आवश्यक आहे. याकरिता ऑनलाइन अर्ज कापारेट अफेअर्स मंत्रालया कडे करावा लागत.
  • उत्पादक कंपनीचे नाव निश्चित करणे :- उत्पादक कंपनीचे नाव ………….. उत्पादक कंपनी लिमिटेड असे ठेवावे लागते. कंपनीच्या मुख्य उद्देशाला अनुसरून असलेल्या ५ नावपैकी एक नाव निवडावे लागते .ते नाव या पूर्वी नोंदणी झालेल्या कंपनीच्या नावासारखे नसावे.याकरिता कंपनी निबंधकाकडे रु ५००/- चे शुल्क भरून e-from (A) s नमुन्यात http://www.mca.gov.इन वर लॉगिन  करावे लागते व डिजिटल स्वाक्षरी असणार्‍या व्यक्तीने अर्ज करावा लागतो. प्रस्तावित ५ नाव पैकी एखादे  नाव उपलब्ध नसेल तर कंपनी निबंधका कडून तसे कळविले जाते  त्या नंतर अर्जदाराने नवीन नाव सुचवायचे असते.एकदा निश्चित झालेले कंपनी चे नाव १/३ साधारण सभेच्या व २/३ संचालक मंडळाच्या बहुमताने ठराव पारित केल्यास व तसा अर्ज निबंधका कडे  केल्यास अर्जा सोबत रु ५००/- चे शुल्क भरून व ५ नवीन नावे प्रस्तावित करून बदलता येते .
  • मेमोरन्डम  ऑफ असोसीशन व आर्टीकल ऑफ आसोसीयशन (MOA व AOA) ही कागद पत्रे कागदाच्या दोन्ही बाजुवर प्रिंट करून त्यावर स्टॅम्प लावावा लागतो व त्या वर प्रवर्तकने स्वत:चे,वडिलांचे नाव ,धंदा ,पत्ता व धारण केलेले शेअर्स ची संख्या ही माहिती भरून दिंनांकसह स्वाक्षरी करायची असते .
  • रजिस्ट्रार ऑफ कंपनी कडे (ROC) नोंदणी करिता सादर करावयाची कागदपत्रे

रजिस्ट्रार यांचे कंपनीचे नाव उपलब्ध असल्या बाबतचे पत्र .

  • मेमोरन्डम  ऑफ असोसीशन व आर्टीकल ऑफ आसोसीयशन (MOA व AOA) च्या स्टॅम्प लावलेल्या व स्वाक्षरी केलेल्या प्रती
  • फॉर्म  १८  मध्ये कंपनी च्या नोंदणी कत कार्यालयाचा पूर्ण पत्ता
  • फॉर्म  ३२ मध्ये कंपनीच्या संचालकांची माहिती व कंपनी निर्मिती  संबंधी सर्व कायदेशीर तरतुदीचे पालन करीत असल्याचे डिक्लेरेशन .
  • मेमोरन्डम ऑफ असोसीशनजर हिन्दी भाषेत असेल तर ते समजले असल्याचे शपथ पत्र
  • मुख्यत्यार पत्र

 

  • सर्टिफिकेट ऑफ इनकापररेशन –सर्व आवश्यक कागद पत्रांचे पूर्तता झाली असे निबंधकाचे समाधान झाल्यास ३० दिवसाचे आत नोंदणी प्रमाण पत्र देण्यात येते. कंपनी ला सामायिक शिक्का असतो.कंपनीचे संचालक मंडळ किंवा साधारण सभा आपल्या मधून एकाची किंवा साधारण सभा आपल्या मधून एकाची किंवा बाहेरील व्यक्तीची आपल्या वतीने काम करण्या करीत निवड करते त्याला पॉवर ऑफ अटर्णी किवा मुखत्यापत्र म्हणतात. पॉवर ऑफ अटर्णी करिता कंपनी सेक्रेटरीची निवड करण्यात येते या करिता पॉवर ऑफ अटर्णी फार्म ,स्टॅम्प लाऊन व संचालकांची स्वाक्षरी घेऊन  दिला जातो.
  • कंपनी ची नोंदणी झाल्यावर करावयाची कामे :-
  1. कमीत कमी दोन स्वाक्षरीने  चालणारे बँक खाते उघडणे .
  2. आयकर विभागा कडून पॅन कार्ड व कपरेट टॅक्स विभागा कडून TAN क्रमांक मिळवावा लागतो .सेवाकर व मूल्यवर्धित  करा करिता देखील नोंदणी करावी लागते .
  3. कार्यालया करिता विज पुरवठा ,फर्निचर व नाम फलक उपलब्ध करावे लागते .

   ५ लाख रुपयांचे भाग भांडवल असणार्‍या कंपनीच्या नोंदणी करिता खालील खर्च लागतो.

अनू क्र
बाब
रक्कम रु
अ)
कंपनीचे नांव मिळण्या करिता अर्ज करणे
रु ५००
ब)
डिजिटल स्वाक्षरी
रु २६००
क)
स्टॅम्प ड्युटी (MOA)
रु ५००
स्टॅम्प ड्युटी (AOA)
रु १०००
ड)
नोंदणी शुल्क – MOA
रु १६०००
        AOA
रु ३००
रु ३००
फार्म -१८
रु ३००
फार्म -३२
रु ३००
ई )
सीए किंवा सीएच ची फी कन्सलटन्सी फी
रु १००००
स्टॅम्प कन्सेलेशन
रु ३००
शपथ पत्र / नोटरी फी
रु ४५०
फ )
शेअर्स ट्रान्सफर फी
रु ५०००
एकूण रु
३७५५०/-
कंपनी च्या संचालकांची सभा :-
कंपनी नोंदणी झाल्या वर ३० दिवसाचे आत संचालक मंडळाची सभा आयोजित करावी लागते .या सभेचे विषय स्थानिक भाषे मध्ये किंवा इंग्रजीत तयार करावे व त्या वर व्यवस्थापनाने स्वाक्षरी करावी व या प्रमाणे विषय पत्रिका तयार करून ती कंपनी च्या संचालकांना आठ दिवस अगोदर पाठवावी .

Ø सभेचे विषय :-

· कंपनी नोंदणी दस्त ऐवजा बाबत माहिती
· बँक खात्या बाबत ठराव –कोणाचे नाव ,कोणत्या बँकेत व रक्कम
· अधिकृत स्वाक्षरी कोणाची असावी ते ठरविणे.
· अंतिम मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशन व आर्टिकल ऑफ असोसिएशन सादर करणे.
· व्यवस्थापनाची नियुक्ती करणे .
· व्यवसाय आराखड्याला मंजूरी देणे.
· अध्यक्षाच्या परवानगिने  इतर विषयावर चर्चा

Ø कंपनी नोंदणी नंतर ९० दिवसाच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे लागते व सर्व भागधारकांना  १५ दिवस अगोदर बैठ्किचा अजेंडा पाठवावा .

Ø वार्षिक सभेचे विषय:-

·  अध्यक्षाची निवड .
· नोंदणी खर्चाला सम्मती
· संचालकाची नियुक्ती
· व्यवस्थापकाची नियुक्ती
· व्यवसाय आराखडा, अंदाजपत्रक यास मंजूरी ऑडिटर ची नियुक्ती
· वार्षिक सभेचे इतिवृत्त आर ओ सी यांना पाठवावे
· दर वर्षी ३० मार्च पर्यात ऑडीट रिपोट आरओसी ला सादर करावा .

Ø मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशन (MOA)

·        उद्दोगाचे वा कंपनीचे उद्देश स्पष्ट केले जातात .
·        कार्यकृती ची व्याख्या
·        भविष्यकालीन कृती कार्यक्रम
·  कृती कार्यक्रमातून उत्पादकाणा मिळणारा लाभ इत्यादि बाबी स्पष्ट केल्या जातात

Ø आर्टिकल ऑफ असोसिएशन (AOA)

कंपनीचे भौगिलोक कार्यक्षेत्र
कंपनी चा पत्ता
सदस्यत्वाचे नियम
सदस्य करिता नियम चौकट
संचालकच्या सभा करिता वा वार्षिक सर्व साधारण सभे करिता चौकट आखणे.
वार्षिक सर्व साधारण सभेकरिता कार्यप्रणाली
मुळ लाभाचे वितरण

Ø शेतकरी उत्पादक कंपनीला खालील प्रकारची नोंदणी करावी लागते

o   पॅन कार्ड व जीएसटी नंबर
o   शॉप अँड एस्टाब्लीशमेंट अॅक्ट
o   आयात –निर्यात कोड

शेतकरी उत्पादक कंपनीला खालील बाबीची पूर्तता प्रत्येक वर्षी करावी लागते

·  बँलन्स शिट व नफा –नुकसान पत्रक ,वार्षिक साधारण सभेच्या नंतर ६० दिवसाचे आत आर ओ सी ला सादर करावे लागते .
·  कम्प्लायन्स सर्टीफिकेट
· वार्षिक परतावा
· वैधानिक रजिस्टर्स
· वर्षातुन  कमीत कमी चार सभा आयोजित करणे
· वार्षिक सर्व साधारण सभा आयोजित करणे

शेतकरी उत्पादक कंपनी खालील प्रकारची कामे करू शकते .

·  भाग धारक शेतकर्‍यांना सेवा देणे
· लहान शेतकर्‍यांच्या संघाकडून बळकटीकरण
· नाबार्ड कडून विकास कार्यालय मदत मिळविणे
· अभ्यास दौरे ,प्रात्याक्षिके,पिक विमा , प्रशीक्षणे आयोजित करणे
· कृषि सेवा केंद्र ,सदस्यांना अवजारे भाड्याने देणे ,सदस्यांना कर्ज देणे बँक सेवा, प्रतवारी व मूल्य संवर्धन करणे,करार शेती ,बाजाराची माहिती,तारण कर्ज ,शेत मालाचे विक्री करिता एकत्रिकरण करणे
· एस एफ ए सी कडून व्हेचर कॅपिटल ,जे कंपनीच्या भांडवलाच्या ४०% असेल ते देणे इक्विटी कॅपिटल ग्रँट रु १०.०० लाख पर्यंत .एक कोटी रूपया पर्यात च्या कर्जकरिता बंकेला कर्ज हमी देणे,या करिता भागधारकांची संख्या ५०० असणे, ३३.३३% शेतकरी ५ एकर पेक्षा कमी भूधारणा असणारे व कमीत कमी एक संचालक स्त्री असणे आवश्यक आहे .
· नाबार्ड कडून एस एफ ए सी ने हमी घेतल्यास एक कोटी रूपया पर्यत चे कर्ज मिळते .

रजिस्ट्रेशन कार्यालय ROC ऑफिस चा पत्ता :-
1)  Mumbai:-
Registrar of Companies Mumbai,100,Everest,Marine Drive,
Mumbai 400002
Phone :- 022-22812627/22020295/22846954
2)  Pune :-
 Registrar of Companies Pune
 PCNTDA Green Building,block A 1st &2nd floor,
 Near Akurdi Railway Station,Akurdi
 Pune -411044
 Phone :- 02027651375/020-27651378