गडचिरोली:
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना 10 ते 20 लाखापर्यंत इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी / विद्यार्थीनींना उच्च शिक्षणासाठी सदर योजना बँकेमार्फत राबविण्यात येते आहे. बँकेकडून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रु.10.00 लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी रु.20.00 लक्ष इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येईल. विद्यार्थीचे वय 17 ते 30 वर्षे असावे व तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा.अर्जदाराचे कौटुंबिक वार्षीक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता रु.8 लक्ष पर्यंत असावे. अर्जदार 12 वी 60% गुणांसह उत्तीर्ण असावा.देशांतर्गत अभ्यासक्रम 1)आरोग्य विज्ञान, 2) अभियांत्रीकी, 3) व्यावसायीक व व्यवस्थापन, 4) कृषी , अन्नप्रक्रीया व पशुविज्ञान परदेशी अभ्यासक्रम 1)आरोग्य विज्ञान, 2) अभियांत्रीकी, 3) व्यावसायीक व व्यवस्थापन, 4) विज्ञान 5) कला बॅकेने उपलब्ध करुन दिलेल्या कर्जामध्ये फक्त शैक्षणिक शुल्क पुस्तके व साहीत्य खरेदीचा समावेश राहील परदेशी अभ्यासक्रमासाठी QS च्या रॅकींग 200 च्या आतील व GRE,TOEFL परिक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.
इच्छुक उमेदवारांनी योजनेसंदर्भात www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट दयावी. तसेच कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,सामाजिक न्याय भवन,आय.टी.आय. मागे गडचिरोली येथे संपर्क साधावा.