गडचिरोली: भारत निवडणूक आयोगाने दिनांक 14 जूलै,2022 च्या पत्रान्वये दिनांक 01 नोव्हेंबर,2022 या अर्हता दिनांकावर आधारीत नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या ( de-novo) तयार करावयाचा पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. दिनांक 01 नोव्हेंबर,2022 या आर्हता दिनांकावर आधारीत नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या ( de-novo) पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत, आपले नाव शिक्षक मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यायासाठी दिनांक 01 ऑक्टोंबर, 2022 पासुन अर्ज स्विकारणे सुरु होणार आहे. आपले नाव शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नोंदविण्यासाठी आपल्या मुळ रहिवासच्या तालुक्यातील तहसिल कार्यालय मधुन नमुना क्रमांक-19 अर्ज प्राप्त करुन संबंधीत अर्ज नमुना क्रमांक -19 वर दिलेली माहिती भरुन संबंधीत उपविभागीय अधिकारी/तहसिल कार्यालय मध्ये सादर करावे, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली, समाधान शेंडगे यांनी कळविले आहे.
Related Articles
लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात ४ हजार ६२ पशुपालकांच्या खात्यांवर १० कोटी रुपयांची नुकसान भरपाई जमा
मुंबई, दि. 9 : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा 4 हजार 62 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून 10.44 कोटी रुपये जमा करण्यात आले असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. श्री. सिंह म्हणाले, राज्यामध्ये दि. 9 नोव्हेंबर 2022 अखेर 33 जिल्ह्यांमधील एकूण 3439 संसर्ग केंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून […]
मुंबईतील सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कांदिवलीतील ‘स्कायवॉक’, सरकता जीन्याचे भूमिपूजन. श्रीकृष्णनगर नदीवरील पुलाचे लोकार्पण मुंबई दि.11 : कांदिवलीच्या समता नगर येथील स्कायवॉक आणि सरकता जीना हा सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी पडणार आहे. या स्कायवॉकमुळे सर्वसामान्यांचे पैसे आणि वेळ वाचेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या भूमिपूजन सोहळ्यासाठी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार प्रवीण दरेकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. […]
माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या विकासकामांची आजही जोरदार चर्चा!
माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांच्या निधीतून अनेक विकासकामे झाली असून आजही त्या कामांची जोरदार चर्चा सुरू आहे. २०१४ मध्ये पहिल्यांदाच राजे अम्ब्रिशराव आत्राम अहेरी विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून आले.राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी आदिवासी विकास व वन खाते […]