ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

लोकरथ घडामोडी 11 नोव्हेंबर 2022

 

UIDAI ने आधार कार्ड अपडेट संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे,प्रत्येक व्यक्तीला 10 वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य असणार आहे.

 केंद्र सरकारने एक नवीन तंत्रज्ञान D2M Plan For Direct Broadcast घेऊन येत आहे , त्यामुळे आता नेटवर्कला बायपास करून नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओचं स्ट्रीमिंग थेट तुमच्या मोबाईलवर केले जाईल.

 जगातील आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबई – पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत बांधण्यात येईल असे मुखयमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

 भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते – सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड सहभागी होणार असून नांदेडमध्ये दाखल देखील झाले आहेत.

 T20 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडने चार ओव्हर आणि 10 विकेट राखून प्रभाव केला, तसेच फायनलमध्ये पाकिस्तान आणि इंग्लॅन्डचा सामना होणार आहे .