गडचिरोली:जिल्हयातील सर्व कनिष्ठ/वरिष्ठ व व्यावसायीक/बिगरव्यावसायीक, अनुदानीत विनाअनुदानीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांना यांना सुचित करण्यात येते की, समाज कल्याण व बहुजन विभागाअंतर्गत राबविणत येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेंअंतर्गत सन 2018 -19 ते 2021-22 या कालावधीतील महाडिबीटी पोर्टलवरील विविध तांत्रिक कारणांमुळे गडचिरोली जिल्हयातील 2247 विद्यार्थी व 1980 महाविद्यालयांची शिष्यवृत्ती प्रलंबीत आहे, त्या अनुषंगाने सर्व गडचिरोली जिल्हयातील महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपले स्तरावरुन तांत्रिक समस्या कळवुन त्यांना महाविद्यालय स्तरावर योग्य मार्गदर्शन करण्यात यावे. तसेच महाविद्यालयाच्या शिष्यवृत्ती संबंधित खात्याविषयी जर तांत्रिक समस्या असल्यास आपण स्वत: प्राचार्य नात्याने लवकरात लवकर समस्येचे निराकरण करावे व तसा अहवाल सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली या कार्यालयास त्वरीत सादर करावा. वरील सुचनेनुसार कोणताही इतर मागासवर्गिय पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास व संबंधित महाविद्यालयाने तांत्रिक समस्या न सोडवल्यास व त्या अनुषंगाने महाविद्यालय अथवा विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास प्राचार्य या नात्याने आपणास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल यांची गांभिर्याने नोंद घेण्यात यावी,असे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.
Related Articles
जितेंदर सिंह शंटी व रविकिरण गायकवाड मदर तेरेसा पुरस्काराने सन्मानित
-लोकरथ बातमी- मुंबई, दि. 24 : कोरोना संसर्गाच्या काळात चार हजार कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार करणारे जितेंदर सिंह शंटी व कोविड रुग्णांसाठी अॅम्ब्युलन्स व ऑक्सिजन टँकर्स पुरविणारे रविकिरण गायकवाड यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मदर तेरेसा स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजभवन येथे झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाला हार्मनी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अब्राहम मथाई व […]
पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु (गाई /म्हशी, शेळ्या, मेंढ्या, व कुक्कूट पक्षी वाटप करणे)
विशेष माहिती : राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असून पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री […]
विविध योजनासाठी भरीव केंद्रीय निधी उपलब्ध व्हावा – कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे
मुंबई, दि. 26 : केंद्र शासन व राज्य शासनाच्या संघटित व असंघटित कामगारांच्या हिताच्या विविध योजना एकत्रितपणे समन्वयाने भविष्यात राबवविणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी सांगितले. दि.25 व 26 ऑगस्ट रोजी केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयामार्फत तिरुपती आंध्र प्रदेश येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या कामगार मंत्री व कामगार सचिवांच्या […]