गडचिरोली:जिल्हयातील सर्व कनिष्ठ/वरिष्ठ व व्यावसायीक/बिगरव्यावसायीक, अनुदानीत विनाअनुदानीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांना यांना सुचित करण्यात येते की, समाज कल्याण व बहुजन विभागाअंतर्गत राबविणत येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेंअंतर्गत सन 2018 -19 ते 2021-22 या कालावधीतील महाडिबीटी पोर्टलवरील विविध तांत्रिक कारणांमुळे गडचिरोली जिल्हयातील 2247 विद्यार्थी व 1980 महाविद्यालयांची शिष्यवृत्ती प्रलंबीत आहे, त्या अनुषंगाने सर्व गडचिरोली जिल्हयातील महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपले स्तरावरुन तांत्रिक समस्या कळवुन त्यांना महाविद्यालय स्तरावर योग्य मार्गदर्शन करण्यात यावे. तसेच महाविद्यालयाच्या शिष्यवृत्ती संबंधित खात्याविषयी जर तांत्रिक समस्या असल्यास आपण स्वत: प्राचार्य नात्याने लवकरात लवकर समस्येचे निराकरण करावे व तसा अहवाल सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली या कार्यालयास त्वरीत सादर करावा. वरील सुचनेनुसार कोणताही इतर मागासवर्गिय पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास व संबंधित महाविद्यालयाने तांत्रिक समस्या न सोडवल्यास व त्या अनुषंगाने महाविद्यालय अथवा विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास प्राचार्य या नात्याने आपणास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल यांची गांभिर्याने नोंद घेण्यात यावी,असे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.
Related Articles
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ग्लोबल ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिलच्या महाराष्ट्र शाखेचे उद्घाटन
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन येथे ग्लोबल ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिल ऑफ इंडिया या व्यापार तंत्रज्ञान परिषदेच्या महाराष्ट्र शाखेचे उदघाटन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी परिषदेच्या महाराष्ट्र शाखेच्या तसेच वर्ल्ड बिझनेस कॉन्क्लेव्हच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या मार्गदर्शकांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी परिषदेचे अध्यक्ष डॉ गौरव गुप्ता, सल्लागार पिनल वानखेडे, महाराष्ट्र शाखेच्या संस्थापक […]
आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी ‘अशी’ घ्या काळजी, ‘यूआयडीएआय’कडून सूचना जारी..!!
सध्या प्रत्येक ठिकाणी आधार कार्डचा वापर केला जातो. मात्र, त्या माध्यमातून फसवणूकीचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे आधार कार्ड वापरताना काळजीही घेतली पाहिजे. याबाबत ‘यूआयडीएआय’कडून महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशी घ्या खबरदारी..! ▪️ ओळखीचा पुरावा म्हणून बँक खाते, पॅन कार्ड, तसेच पासपोर्टसह इतर कोणत्याही दस्तावेजांच्या वापराबाबत जशी खबरदारी बाळगतो, तशीच खबरदारी आधार कार्डच्या वापराबाबतही […]
पुणे महानगर क्षेत्राच्या प्रारूप रचनेत शहरासाठी आवश्यक बाबींचा समावेश करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नगर विकास रचना आणि प्रारूप विकास योजनेच्या आढावा घेतला. प्रारूप विकास योजनेत शहरासाठी आवश्यक सर्व बाबींचा समावेश करावा, असे निर्देश श्री.पवार यांनी यावेळी दिले. बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, पीएमआरडीए […]