केंद्र सरकारने पॅन कार्ड हे आधारला लिंक करणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी वारंवार मुदतवाढही देऊनही अनेकांनी पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक केलेले नाही. याबाबत आयकर विभागाने आता कडक निर्णय घेतला आहे.
पॅन कार्ड रद्द होणार
पॅन कार्ड व आधार लिंकिंगसाठी 31 मार्चपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर 31 मार्च ते 30 जून 2022 पर्यंत 500 रुपये दंड भरुन आधार व पॅन कार्ड लिंक करता येत होते.
आयकर विभागाने 30 जूननंतर दंडाची रक्कम 1000 रुपये केली असून, 31 मार्च 2023 पर्यंत हे काम करावे लागणार आहे. 31 मार्च 2023 नंतर आधारशी लिंक नसलेले पॅनकार्ड आपोआप रद्द होणार आहेत.