गड अहेरी येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन संपन्न
अहेरी:-शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही उज्वल भविष्याची संधी असल्याचे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले.गड अहेरी येथे स्काय 11 क्रिकेट क्लब तर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार,नगर सेवक अमोल मुक्कावार,चिंचगुंडीचे उपसरपंच रामू कस्तुरवार,गड अहेरीचे पोलीस पाटील सुनीताताई दुर्गे,जेष्ठ नागरिक बिरजू गेडाम,जेष्ठ नागरिक रामाजी दब्बा,श्यामराव कुसराम,बॉंध्यालू बुद्दुलवार,सुरेंद्र अलोने आदी मान्यवर उपस्थित होते
पुढे बोलताना अभ्यासासोबतच आपल्याला ज्या क्षेत्रात रुची आहे, त्या क्षेत्रात पुढाकार घ्यावा. आज सुशिक्षित बेरोजगार युवकांची खूप मोठी संख्या वाढली आहे.प्रत्येकाला नौकारीची अपेक्षा असते. मात्र ते शक्य नाही.त्यामुळे ज्यांना ज्या क्षेत्रात रुची आहे,त्यांनी त्या क्षेत्रात मन लावून काम केल्यास समोर त्यातून आपला उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटू शकतो.त्यामुळे युवकांनी विविध क्षेत्रात मिळालेल्या संधीचे सोने करावे असेही भाग्यश्रीताई आत्राम यांनी आवाहन केले
गड अहेरी येथे पोहोचताच गावकरी आणि मंडळातर्फे ताईंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी ताईंच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमांना हार अर्पण करून क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.ताईंनी यावेळी क्रिकेटच्या मैदानात चांगलीच फटकेबाजी केली