Uncategorized गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

ग्रामपंचायतीतील सदस्य/थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकांकरिता पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम घोषित

गडचिरोली,(जिमाका)दि.07: उपायुक्त, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे आदेशान्वये, दिनांक 06 एप्रिल 2023 अन्वये निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे
ग्रामपंचायतीतील सदस्य/थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकांकरिता पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला असून अहेरी तालुक्यातील पुढीलप्रमाणे ग्रामपंचायती समाविष्ठ आहेत – ग्रामपंचायत नागेपल्ली (प्रभाग क्र. 5 अनु. जमाती स्त्री राखीव), पल्ले(प्रभाग क्र.1 अनु. जमाती स्त्री राखीव व प्रभाग क्र. ३ अनु. जमाती), व्येंकटरावपेठा (प्रभाग क्र.2 अनु.जमाती स्त्री राखीव), रेगुलवाही (अनु. जमाती) व मेडपल्ली (अनुसूचित जमाती) इत्यादी आणि प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
निवडणूकीचे टप्पे तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक 18 एप्रिल 2023 (मंगळवार), नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (मंडळ कार्यालय इमारत तहसिल कार्यालय, अहेरी)-दिनांक 25 एप्रिल 2023 (मंगळवार) ते दिनांक 02 मे 2023 (मंगळवार) वेळ सकाळी 11.00 ते दु.3.00 वाजेपर्यंत (दिनांक 29 एप्रिल 2023 शनिवार, दिनांक 30 एप्रिल 2023 रविवार व दिनांक 01 मे 2023 ची सार्वजनिक सुट्टी वगळून), नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्याचा दिनांक व वेळ (मंडळ कार्यालय इमारत तहसिल कार्यालय, अहेरी) दिनांक 03 मे 2023 (बुधवार) वेळ सकाळी 11.00 वाजतापासून छाननी संपेपर्यंत,  नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (मंडळ कार्यालय इमारत तहसिल कार्यालय, अहेरी)- दिनांक 08 मे  2023 (सोमवार) वेळ दुपारी 3.00 वाजेपर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देणे तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक  08 मे 2023 (सोमवार )व वेळ दुपारी 3.00 वाजेनंतर, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 18 मे 2023 (गुरुवार) सकाळी 7.30 वा.पासून ते दुपारी 3.00 वा.पर्यंत. 
अहेरी तालुक्यातील पोटनिवडणूकांसाठी असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात दिनांक 06 एप्रिल 2023 पासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यत आचारसंहिता लागु राहील. संभाव्य उमेदवारांना पारंपारीक पद्धतीने नामनिर्देशनपत्र दाखल करावयाचे असल्याने कार्यालयातून नामनिर्देशन पत्र प्राप्त करुन परिपूर्ण भरुन स्वाक्षरी/अंगठा करुन निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे दाखल करावे. उमेदवारांना त्यांचे नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी नामनिर्देशपत्र, मत्ता व दायित्व तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतचे घोषणापत्र, आवश्यक प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती, तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 10-1 अ (1) नुसार राखीव जागेसाठी निवडणूक लढविणा-या व्यक्तीने नामनिर्देशनपत्राबरोबर सक्षम प्राधिका-याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.  नामनिर्देशन पत्रासोबत जोडावयाच्या घोषणापत्रातील कोणत्याही रकान्याची माहिती कोरी न ठेवता संपूर्ण रकान्याची माहिती भरणेत यावी. ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या उमेदवारांने करावयाच्या खर्चाची सुधारीत मर्यादा सदस्य संख्या 7 ते 9
करिता 25,000 रूपये, 11 ते 13 सदस्य संख्या करीता 35,000 रूपये व 15 ते 17 सदस्य संख्या
करीता 50,000 आहे. नामनिर्देशन पत्रासोबत अनु.जाती किंवा अनु. जमाती यांच्यासाठी राखीव जागेकरीता रूपये 100 (अक्षरी- रूपये शंभर फक्त) व सर्वसाधारण जागेकरीता रूपये 500 (अक्षरी- रूपये पाचशे फक्त ) एवढी अनामत रक्कम रोखीने भरणे अनिवार्य आहे. ग्रामपंचायत नागेपल्ली, पल्ले, व्येंकटरावपेठा, रेगुलवाही व मेडपल्ली येथिल रिक्त सदस्य पदाकरीता नामनिर्देशनपत्र दाखल करणा-या उमेदवाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट असणे अनिवार्य आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करणा-या उमेदवाराचे वय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवार दुस-या प्रभागातील मतदार असल्यास त्याबाबतचा उत्तारा सोबत जोडणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनाकडून कोविड-१९ च्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना व दक्षता घेण्याबाबतच्या सूचना/निर्बंध लागू झाल्यास मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. असे तहसिलदार तथा तालुका निवडणूक अधिकारी, अहेरी यांनी कळविले आहे.