Uncategorized गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांच्या २०० कार्यकर्ते यांचा भाजप पक्ष प्रवेश

मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते 206 शालेय विद्यार्थीना सायलक वाटप

गडचिरोली- जिल्ह्यातील सिरोंच्या तालुक्यात काल माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम हे दौऱ्यावर आले असता तेथील कार्यकर्ते व स्थानिक गावकऱ्यांनी त्यांचा मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात जंग्गी स्वागत केला,तसेच जगदंब फाऊंडेशन सिरोंचा यांचा कडून रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम हे होते,अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले सिरोंचा हा तालुका गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात शेवटच्या टोकावर असल्याने येथील जनतेला रुग्णालयात रूग्णांना ने-आन करण्यासाठी खूप अडचणी येत होत्या त्यामुळे येथील जनतेला रुग्णवाहिकेची अत्यंत गरज होती ही बाब लक्षात घेऊन जगदंब फाऊंडेशन सिरोंचा यांना एक रुग्णवाहिका भेट देण्यात आली आहे आणि जगदंब फाऊंडेशन सिरोंचा यांच्या माध्यमातून येथील जनतेला रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांना ने-आन करण्यासाठी याची मदत होईल,पुढे बोलताना ते म्हणाले आजच्या युवा वर्गानी सामाजिक कार्यात समोर यावे मी आपल्या सोबत आहो,पुढे ते म्हणाले मी आपल्या क्षेत्रातील जनतेच्या प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी सदैव तत्पर आहो,

तसेच त्यावेळी सिरोंच्या तालुक्यातील विविध पक्षाच्या 200 च्या वर कार्यकर्ते यांनी मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.त्यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात *राजे साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है! अश्या घोषणा दिल्या त्यावेळी तेथील वातावरण घोषनेने दुमदुमून गेले.

 

आणि मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी स्थानिक राजे धर्मराव हायस्कूल सिरोंच्या येथे भेट दिली आणि तेथील शालेय विद्यार्थीना 206 सायकली त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या

सिरोंच्या येथील जेष्ठ कार्यकर्त्यांच्या घरी भेटी दिल्या आणि आस्थेने त्यांची विचारपूस केली,तसेच
सिरोंच्या तालुक्यातील भाजप पदाधिकारी,कार्यकर्त्यां यांच्या सोबत येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली आणि समोर येणाऱ्या निवडणूकित जोमाने कामाला लागा अशा सूचना दिल्या
कार्यक्रमाला भाजप तालुकाध्यक्ष शंकर नरहरी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे,अहेरी भाजपा तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, ज्येष्ठ नेते सत्यनारायण मंचालवार, शिक्षक प्रकोष्ट अध्यक्ष संतोष पडालवार, जिल्हा सचिव संदीप राचर्लावार, शहराध्यक्ष सीतापती गट्ट, ओबीसी आघाडी अध्यक्ष रमेश मुंगीवार, जिल्हा
युवा मोर्चा उपाध्यक्ष सतीश पद्मार्टिटी जिल्हा युवा मोर्चा सचिव दिलीप शेनिगारपू जिल्हा अल्पसंख्याक महामंत्री कलाम हुसेन, ज्येष्ठ नेते रंग बापू जगदंब फाउंडेशनचे सर्व सदस्य तसेच किरण कुलसंगे, माहेश्वरी गड्डम रेखा तिपट्टी, गजानन कलाक्षपवार चंद्रन्ना सदनपू देवेंद्र रंगू बेडके तिरुपती, रवी चकिनारपू, चिडेंद्र लंगारी सत्यनारायण जिडी, नागेश ताडबोईन, हे उपस्थित होते.